मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा संजू या सिनेमात मान्यता दत्तची भूमिका साकारतेय. बऱ्याच कालावधीनंतर ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. संजूसाठी दिया मिर्झाने तब्बल ६ वर्षांनी कॅमेरा फेस केला. याचा खुलासा तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केला.
संजय दत्तशी झालेल्या भेटीबाबत ती म्हणाली, मी संजय दत्तचे सिनेमे पाहून मोठी झालीये. सडक, साजन, खलनायक हे माझे आवडते चित्रपट आहेत. साजन जेव्हा मी पाहिला तेव्हा मी खूप खूश होते कारण माझा फेव्हरिट सलमान खान होता. मात्र मला संजय दत्तही आवडू लागलाहोता. संजयसोबत माझा पहिला सिनेमा परिणीता हा होता. त्यानंतर आम्ही शूटआऊट अॅट लोखंडवालाच्या सेटवर भेटलो.
संजय दत्तच्या ३०० गर्लफ्रेंड्स असण्याबाबत दिया म्हणते, मी शॉकच झाले होते. मी राजू सरांनाही विचारले की हे कसे झाले. मात्र मान्यताला त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती होते. ही भूमिका निभावताना मजा आली. सिनेमाचे लिखाण दमदार आहे. चांगले लिखाण असल्यामुळे अभिनय सोपा होतो.
आम्हाला आतापर्यंत वाटत होते की आम्हाला संजय दत्तबद्दल सगळं माहीत आहे मात्र जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा कळलं की आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. पहिल्या दिवसाच्या शूटबाबत दिया म्हणाली, सिनेमातील पहिला शॉर्ट माझ्यासोबत घेण्यात आला. ६ वर्षानंतर मी कॅमेरा फेस केला. ती रात्र बैचेनीची होती. आम्ही मढ आयर्लंडमध्ये शूट करणार होतो. सकाळी सात वाजता शॉट होता. सगळ्यांशी भेटीगाठी झाल्या होत्या. मात्र त्यानंतरही मनात भिती होती की कसं होईल सगळं. मला वाटले की मी डायलॉग विसरलेय. मात्र शॉट आधी राजू सर व्हॅनिटीमधून बाहेर आले त्यांनी मोठा स्माईल दिला. त्यानंतर आम्ही पहिला शॉट घेतला आणि सुटकेचा निश्वास सोडला.