चला हवा येऊ द्या I श्रेयाने केली अमृता सुभाषची मिमिक्री

Updated: Jun 19, 2018, 02:56 PM IST

मुंबई : सर्वांना हास्याची मेजवानी देणारा आपला आवडता आणि अतिशय लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या च्या सेटवर काल झिपऱ्या सिनेमातील कलाकारांनी हजेरी लावली. निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे या कलाकारांनी आपल्या जबरदस्त अदाकारानी आणि सकस विनोदांनी उपस्थित पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना हसवले. यावेळी भाऊ कदम आणि भारत गणेशपूरे यांच्या फटकेबाजीने सर्वांनाच मनमुराद हसवलं. तर सागर कारंडेच्या पुणेरी बाईने भलतीच धमाल उडवून दिली. यात सागरचा 'नागिण डान्स' पाहून हसून हसून लोटपोट व्हाल. श्रेया बुगडेने अभिनेत्री अमृता सुभाषची जबरदस्त मिमिक्री करत प्रेक्षकांची मने जिंकली. तुम्हालाही या धमाल कॉमेडीचा आनंद लुटायचा तर मग जरुर पहा हा व्हिडिओ...