दोन लग्नानंतरही धर्मेंद्र पडले या अभिनेत्रीच्या प्रेमात, जेव्हा हेमा मालिनीला आली शंका...

धर्मेंद्र 'या' अभिनेत्रीला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी दिग्दर्शकांना विनंतीही करु लागले होते

Updated: Apr 26, 2021, 09:37 PM IST
दोन लग्नानंतरही धर्मेंद्र पडले या अभिनेत्रीच्या प्रेमात, जेव्हा हेमा मालिनीला आली शंका... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्रचे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रीसोबत जोडलं होतं. माध्यमांमध्येही जितेंद्र बरेच चर्चेत असतात. लग्नानंतरही ते लगेजच त्या काळची दिग्गज आणि  सुंदर अभिनेत्री हेमा मालिनीच्या जवळ आले आणि त्यांनी तिच्याशी लग्नही केलं. मात्र त्यानंतरही ते थांबले नाहीत आणि धर्मेंद्र 80च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री अनिता राज यांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र आणि अनिता राज यांचं प्रेम टिकलं नसलं तरी या कथेला बरीच चर्चा मिळाली.

धर्मेंद्र आणि अनिता राज यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि शूटिंगदरम्यानच हे दोघं जवळ आले. त्यावेळी धर्मेंद्र यांची पर्सनॅलिटी देखील जबरदस्त होती आणि कामगिरीही उत्कृष्ट होती. अनिता राज 80च्या दशकात बऱ्याच लोकप्रिय होत्या आणि तिला धर्मेंद्र देखील आवडू लागले. धर्मेंद्र अनिता राजला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी दिग्दर्शकांना विनंती करु लागले. अनिता राज आणि धर्मेंद्र यांच्या वयातही बराच फरक होता. धर्मेंद्रपेक्षा अनिता 27 वर्षांनी लहान आहे.

जेव्हा हेमा मालिनीला आली दोघांच्या अफेअरची शंका
शुटिंगदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या आणि लवकरच ते माध्यमांसमोर आले. हेमा मालिनी यांना या प्रकरणाची माहिती मिळताच ती चक्रावून गेल्या आणि देओल कुटुंबात गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी धर्मेंद्रला अनिता राजपासून दूर राहण्याची सूचना दिली. या नात्यामुळे अनिता राज यांनाही बर्‍याच वादाचा सामना करावा लागला.

कोण आहे अभिनेत्री अनिता राज
अनिता राज तिच्या काळातील खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. 1982 मध्ये तिने 'प्रेम गीत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'अच्छा बुरा', 'जान की बाज़ी', 'मोहब्बत की क़सम', 'प्यार किया है प्यार करेंगे', और 'करिश्मा क़ुदरत का' अशा अनेक चित्रपटांत ती मुख्य भूमिकेत दिसली आहे. त्यांनी 1986 मध्ये 'करिश्मा कुदरत का' दिग्दर्शक सुनील हिंगोरानीशी लग्न केलं. या दोघांना शिवम हिंगोरानी नावाचा मुलगा आहे.