१८ वर्षांनंतर धनुष आणि ऐश्वर्याचा मोडला संसार

एकमेकांपासून वेगळ होत असल्याची ट्विट करून दिली माहिती 

Updated: Jan 18, 2022, 08:01 AM IST
१८ वर्षांनंतर धनुष आणि ऐश्वर्याचा मोडला संसार  title=

मुंबई : सामंथा प्रभु आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर आणखी एका लोकप्रिय जोडी वेगळी होत आहे. अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या त्यांच १८ वर्षांचं नातं संपवत असून एकमेकांपासून वेगळे होत आहे. चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. 

धनुषने ट्विट करून दिली माहिती 

या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. धनुष म्हणतो की,'१८ वर्षांची सोबत, मैत्री, दाम्पत्य , पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक एकमेकांच्या साथीने, समजूतदारपणाने आणि विश्वासाने मार्ग स्वीकारला. आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत. जेथून आमचे मार्ग वेगळे होत आहे. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वतःला शोधण्याचा निर्णय घेणार आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर खरा. खासगी बाब असल्याच लक्षात ठेवा. एकमेकांसोबत ही गोष्ट करू द्या.'

ऐश्वर्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. या दोघांचं लग्न २००५ साली झालं. या दोघांना दोन मुलं आहेत. यात्रा आणि लिंगा. त्यांचा जन्म २००६ आणि २०१० साली झाला आहे. 

तसेच धनुष हा लोकप्रिय निर्माता कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष हा मल्टीटॅलेंटेड आहे. तो अभिनेता होण्यासोबतच दिग्दर्शक, प्रोड्युसर, डान्सर, प्लेबॅक सिंगर, लिरिसिस्ट आणि स्क्रीनप्ले रायटर आहे. ४६ सिनेमांत काम केलेल्या सुपरस्टार धनुषला आतापर्यंत एक फिल्म फेअर अवॉर्ड, ४ नॅशनल फिल्म अवॉर्डसह १३ मोठे पुरस्कार मिळाले आहेत.