धनुष-ऐश्वर्या कोट्यधीश, एका चित्रपटासाठी घेतो ऐवढे पैसे

धनुष-ऐश्वर्याच्या कमाईचा आकडा पाहून, तुम्हालाही विश्वास बसणार नाही...  

Updated: Jan 19, 2022, 10:47 AM IST
धनुष-ऐश्वर्या कोट्यधीश, एका चित्रपटासाठी घेतो ऐवढे पैसे title=

मुंबई : नॅशनल अवॉर्ड विनर आणि अभिनेता धनुषला लोकप्रियता मिळाली ती म्हणजे 2013 साली. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. धनुषच्या 'कोलावरी डी' या गाण्याला रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. युट्यूबवर सर्वत्र फक्त आणि फक्त याच गाण्याची चर्चा होती. धनुषच्या या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. या गाण्याला स्वतः धनुषने आवाज दिला आहे. 

पण आता धनुष एका खासगी कारणामुळे चर्चेत आला. धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाला आहे. ऐश्वर्या सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त होण्याची माहिती दिली. 

धनुष आणि ऐश्वर्याने 18 वर्ष जुनं नातं घटस्फोट देवून संपवलं आहे. रिपोर्ट्सनुसार दोघांच्या कमाईचा आकडा थक्क करणारा आहे. धनुषने 2020 मध्ये 145 कोटींची कमाई केली. मागील वर्ष 2021 मध्ये त्यांनी 160 कोटी रुपयांची कमाई केली. 

रिपोर्टनुसार धनुष एका चित्रपटासाठी तब्बल सात ते आठ कोटी रूपये मानधन घेतो. गेल्या पाच वर्षांत धनुषची एकूण संपत्ती मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. चित्रपटाव्यतिरिक्त धनुष जाहिराती आणि इतर गोष्टींमधूनही कमाई करतो. 

एवढंच नाही तर धनुषकडे इतरही अनेक मालमत्ता आहेत. दुसरीकडे, जर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याबद्दल सांगायचं झालं तर ती देखील वर्षभरात कोट्यवधी रुपये कमावते. ऐश्वर्या व्यवसायाने गायिका असून ती वर्षाला 7 ते 35 कोटी कमावते.