खंडोबाचा खड्ड्यांसोबतचा सेल्फी व्हायरल

मुंबईतल्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेवर सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगलीये. पावसाळा सुरु झाला की ठिकठिकाणी खड्ड्यांचे राज्य दिसू लागते.

Updated: Jul 22, 2017, 10:26 PM IST
खंडोबाचा खड्ड्यांसोबतचा सेल्फी व्हायरल title=

मुंबई : मुंबईतल्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेवर सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगलीये. पावसाळा सुरु झाला की ठिकठिकाणी खड्ड्यांचे राज्य दिसू लागते.

झी मराठी वाहिनीवरी प्रसिद्ध मालिका जय मल्हारमध्ये खंडेरायाची भूमिका साकारणारा देवदत्त नागेचाही खड्ड्यांसोबतचा सेल्फी व्हायरल होतोय.

देवदत्त नागे अलिबागमध्ये राहतो. अलिबागमध्येही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेय. या सेल्फीतून त्याने हेच दाखवलेय. जेणेकरुन प्रशासनाला जाग यावी आणि खड्डे बुजवले जावेत.