लोकप्रिय गायिकेला साखरपुडा तुटल्यावर आपल्या जेंडरची ओळख झाली, केला धक्कादायक खुलासा

केला सर्वात मोठा खुलासा 

Updated: May 21, 2021, 10:35 AM IST
लोकप्रिय गायिकेला साखरपुडा तुटल्यावर आपल्या जेंडरची ओळख झाली, केला धक्कादायक खुलासा  title=

मुंबई : डिमी लोवाटोने आपल्या आयुष्याबद्दल खूप मोठा खुलासा केला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सांगितलं की ती नॉन बायनरी आहे. यापुढे ती आपल्या जेंडरसाठी यापणे न्यूट्रल प्रोनाऊन वापरताना दिसणार आहे. डिमीने आपल्या पॉडकास्ट सीरिज 4D मध्ये याबाबत सांगितलं आहे. 

डिमीने आपल्या व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, प्रत्येक दिवशी आपण उठतो. आपल्याला एक संधी मिळते की, आपल्याला काय हवं ते बनू शकतो. मी माझं आयुष्य सर्वाधिक तुमच्यासमोर घालवलं आहे. मला तुम्ही चांगल, वाईट सगळंच सांगितलंत. माझ्यासाठी माझं जीवन फक्त माझं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Demi Lovato (@ddlovato)

ती पुढे म्हणते की, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट शेअर करणार आहे. माझी ओळख ही नॉन-बायनरी रुपात आहे. त्यामुळे माझं प्रोनाऊन हे बदलत्या रुपात असणार आहे. They and Them असं होणार आहे. 

डिमी लोवाटो आपल्या चाहत्यांसोबत ओपन होण्याबद्दल ओळखलं जातं. ती कायमच चाहत्यांसोबत जे आहे ते स्पष्टपणे मांडतात. मार्चमहिन्यात तिला पॅनसेक्युअल नावाने ओळखलं गेल. मार्च महिन्यात डिमीन Max Ehrich सोबतचा साखरपु़डा तुटला आहे. यामुळे सेक्युअलिटीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. यावर विचार करायला भाग पाडलं.