'छपाक' शुटिंग मधील दीपिकाचा फोटो व्हायरल

दीपिका पादुकोन 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यास सज्ज झाली आहे. 

Updated: Apr 8, 2019, 11:51 AM IST
'छपाक' शुटिंग मधील दीपिकाचा फोटो व्हायरल title=

मुंबई : 'पद्मावत' चित्रपटानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोन 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यास सज्ज झाली आहे. सध्या दीपिका तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या वेळेसचा तिचा एक लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. तिच्या या लूकचे भरभरून कौतुक होत आहे. तिचा हा लूक इंटरनेटवर भलताच व्हायरल होत आहे.

नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. 'छपाक' चित्रपटात दीपिका एक अव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांनी आणि सेलेब्रिटींही तिच्या या लूकची प्रशंसा केली होती. 

ऑसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या काही कठीण प्रसंगावर बेतलेला हा चित्रपट आहे. ऑसिड हल्ला होवूनही आयुष्य स्वछंदीपणे जगणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीच्या आयुष्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

the only kinda homework I’ve ever enjoyedchhapaak

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोनच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे. १० जानेवरी २०२०ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे अभिनेता अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सुध्दा  १० जानेवरी २०२० ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.