बेबी प्लानिंगवर दीपिकाचे स्पष्टीकरण

दीपिका - रणवीरच्या लग्नाला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. 

Updated: Oct 11, 2019, 07:45 PM IST
बेबी प्लानिंगवर दीपिकाचे स्पष्टीकरण title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंगच्या लग्नाला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. लग्नानंतर अनेक वेळा दीपिकाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण प्रत्येक वेळेस या चर्चा फक्त अफवा ठरल्या. नेहमीच्या अफवांमुळे त्रासलेल्या दीपिकाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हिन्दुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे. 

दीपिका म्हणते , 'रणवीर आणि मला पालक व्हायचं आहे. पण आता नाही. रणवीरला देखील माझ्या प्रेग्नन्सीच्या अफवांबद्दल माहित आहे. सध्या आमचं पूर्ण लक्ष फक्त करिअरवर आहे. यादरम्यान पालकत्वाची जबाबदारी घेणं योग्य नाही. म्हणून याविषयी आम्ही अद्याप काही ठरवलं नाही.'  

रणवीर लवकरच '८३' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. '८३' चित्रपट वर्ल्ड कप १९८३ वर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. रणवीर या भूमिकेसाठी अतिशय मेहनत करत आहे.

या चित्रपटात रणवीरच नव्हे, तर अभिनेत्री दीपिका पदुकोणही या चित्रपटातून झळकणार आहे. ती लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसेल. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा दीपिका साकारणार आहे.