मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन आज एकमेकांचे चांगले मित्र असले तरी, एक वेळ अशी होती की ब्रेकअपनंतर ही जोडी एकमेकांपासून दूर होती. ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनीही मीडियामध्ये एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. एकेकाळी बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. रणबीरपासून विभक्त झाल्यानंतर दीपिका पदुकोण डिप्रेशनमध्ये गेली होती.
ब्रेकअपनंतर रणबीर कपूर बहीण आणि अभिनेत्री करीना कपूर खानसोबत करण जोहरच्या शोमध्ये पोहोचला. जिथे रॅपिड राउंड दरम्यान, रणबीर कपूरने दीपिका पदुकोणला सर्वात वाईट मुलगी म्हणून सांगितलं.
एवढंच नाही तर यावेळी दीपिकाला रणबीरला कंडोम भेट द्यायचं होतं. त्यात सोनम कपूरने तिला पाठिंबा दिला होता. सोनम कपूर आणि दीपिका पदुकोण एकदा 'कॉफी विथ करण' या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये एकत्र गेल्या होत्या.
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या अफेअर सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत कॉफी विथ करणच्या रॅपिड फायरच्या वेळी दीपिकाला रणबीर कपूरला कोणते गिफ्ट द्यायचे आहे असे विचारले असता तिने 'कंडोमचे पॅकेट' असे उत्तर दिले.
त्यानंतर जेव्हा करणच्या शोमध्ये रणबीर आला तेव्हा त्याने कंडोमच्या उत्तरावर दीपिकाला उत्तर दिलं होतं. रॅपिड फायर राउंड दरम्यान, करण जोहरने रणबीरला एक प्रश्न विचारला की, तुझ्यासाठी सर्वात वाईट मुलगी कोण आहे? यावर अभिनेत्याने पहिलं नाव दीपिका पदुकोणचे घेतलं. तर दुसऱ्या क्रमांकावर सोनम कपूर होती.