रणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली

रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात

Updated: Jun 1, 2018, 06:00 PM IST
रणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली  title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या अफेअर्सच्या चर्चा आता केवळ चर्चा राहिल्या नाहीत तर त्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालंय. हे दोघंही अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्र' या सिनेमात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच त्यांच्यात प्रेम फुललंय. आपल्या नात्याबद्दल रणबीरनं आपल्या एक्स-गर्लफ्रेंडसमोरही मन मोकळं केलंय... ही एक्स - गर्लफ्रेंड म्हणजे कतरिना नाही बरं का... तर ही एक्स म्हणजे दीपिका पादूकोण... 

दीपिका पादूकोण आणि रणबीर कपूर हे जवळपास दोन वर्ष नात्यात होते... त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं... पण या दोघांत आजही चांगली मैत्री आहे. त्यामुळेच दीपिकालाही आलिया - रणबीरच्या नात्याबद्दल माहीत आहे, असं रणबीर -दीपिकाच्या एका कॉमन फ्रेंडनं म्हटलंय.

या कॉमन फ्रेंडच्या म्हणण्यानुसार, रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात... त्यामुळेच रणबीरनं दीपिकासमोर आपल्या नव्या नात्याबद्दल मन मोकळं केलंय. दीपिकाला जेव्हा रणबीर-आलियाच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा तीदेखील या दोघांसाठी आनंदी होती. 

सुरुवातीला तर आपल्या ब्रेक अपच्या आणि आपल्या नव्या नात्याच्या प्रश्नांवर रणबीर आणि आलिया दोघांनीही शांत राहणंच पसंत केलं होतं... नंतर  मग एकमेकांकडे पाहत 'आपल्यात असं नातं आहे का?' असा प्रश्न विचारत हलकासा होकारही दिला... परंतु, उघडपणे बोलणं दोघंही अजून टाळतंच आहेत. अजूनही सगळं काही नवं आहे, आत्ताच या विषयावर बोलणं योग्य नाही... असं ते म्हणत असतील तर तुम्हीच तुम्हाला काय समजायचं ते समजून जा!

उल्लेखनीय म्हणजे, २०१८ सालचं सर्वात हॉट कपल कोण? या प्रश्नावर प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रानं उत्तर दिलं 'आलिया आणि रणबीर'... आणि मग या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.