लग्नाबद्दल दीपिकाने केला मोठा खुलासा...

सध्या रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. 

Updated: Apr 7, 2018, 03:05 PM IST
लग्नाबद्दल दीपिकाने केला मोठा खुलासा... title=

मुंबई : सध्या रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. पण त्या दोघांकडूनही याबद्दल काही कळलेले नाही. पण एका मुलाखतीत दीपिका म्हणाली की, ती लग्नासाठी तयार आहे. इतकंच नाहीतर आज मी स्वतःला वर्कींग वाईफ आणि आईच्या रुपात पाहु शकते, असेही ती म्हणाली. अलिकडेच दीपिकाने जर्नलिस्ट अनुपमा चोप्राला एक मुलाखत दिली. त्यात तिने अनेक गोष्टींचा उलघडा केला. दीपिका म्हणाली की, लग्न माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. मी माझ्या पालकांना पाहिले आहे आणि मलाही त्यांच्याप्रमाणे आयुष्य हवे आहे. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मला याची जाणीव होईल आणि माझे लग्न व्हायचे असेल तेव्हा होईल. 

माझ्यासाठी ते महत्त्वाचे 

पुढे ती म्हणाली की, मी कामापासून दूर निघून जाईन, हे माझ्यासाठी खूप कठीण असेल. मला असे वाटते की, घर, परिवार, आई-वडील आणि लग्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता मी स्वतःला वर्कींग वाईफ आणि आई म्हणून पाहु शकते. मज्जेत दीपिका म्हणाली की, जर मी काम सोडले तर माझ्या आजूबाजूचे लोक पागल होतील. 

ते मी कधीच विसरणार नाही

तर आपल्या सिनेमांबद्दल बोलताना दीपिका म्हणाली की, पीकू हा एक लहान सिनेमा असला तरी त्यात मोठा अर्थ दडला आहे. आणि मला माझ्या सिनेमात तेच शोधायचे आहे. माझ्यासाठी बजेट महत्त्वाचे नाही. तर गोष्ट महत्त्वाची आहे. तिच्या यशाबद्दल ती म्हणते की, मी काय केले म्हणून मी इथे आहे, ते नेहमी लक्षात ठेवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मला ते कधीच विसरुन चालणार नाही.