दीपिका पदुकोणचं बॉडीगार्ड जलालसोबत स्पेशल नातं

बॉलिवूडचे मोठे स्टार्स नेहमी त्यांच्याभोवती बॉडीगार्ड ठेवतात. 

Updated: Aug 8, 2021, 10:34 PM IST
दीपिका पदुकोणचं बॉडीगार्ड जलालसोबत स्पेशल नातं title=

मुंबई : बॉलिवूडचे मोठे स्टार्स नेहमी त्यांच्याभोवती बॉडीगार्ड ठेवतात. कधीकधी हे प्रोफेशनल संबंध खूप जवळचे बनतात. आत्तापर्यंत सलमान खानचा बॉडीगार्ड शेरासोबतच्या त्याच्या जवळीकीबद्दल तुम्हाला माहिती आहेच. सलमानच्या सावलीप्रमाणे शेरा त्याच्यासोबत नेहमी राहतो तसंच सलमानही शेराला त्याच्या भावाप्रमाणे वागवतो. त्याचबरोबर, आता आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोणचा बॉडीगार्ड जलाल बद्दल सांगणार आहोत, जो गेल्या अनेक वर्षांपासून दीपिकाच्या सर्वात खास लोकांपैकी एक आहे.

दीपिका पदुकोण गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. 'ओम शांति ओम' या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर ती आजपर्यंत अव्वल अभिनेत्रींच्या यादीत कायम आहे. जेव्हाही दीपिका पब्लिकप्लेसमध्ये असते, तेव्हा बरेच लोक तिची एक झलक मिळवण्यासाठी हतबल असतात. अशा परिस्थितीत तिचा बॉडीगार्ड जलाल दीपिकाला गर्दीपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी घेतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो हे काम चांगल्या प्रकारे पार पाडत आहे.

दीपिका जलालला भाऊ मानते
एका बातमीनुसार, दीपिका पदुकोण तिचा बॉडीगार्ड जलालला फक्त सपोर्ट स्टाफ म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणून मानते. म्हणूनच जलाल अनेक वर्षांपासून या पदावर कार्यरत आहे. इंडस्ट्रीतील लोक सांगतात की, दीपिका जलालला भाऊ मानते. एवढंच नाही तर या नात्याच्या मजबुतीचा पुरावा म्हणजे दीपिका जलालला राखीही बांधते.

एवढा आहे जलालचा पगार 
एका अहवालानुसार, जलालला दीपिकाच्या संरक्षणासाठी खूप पगार मिळतो. जलालचं वार्षिक पॅकेज सुमारे 80 लाख रुपये आहे. मात्र, अनेक अहवालांमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, 2017 मध्ये जलालचा पगार वार्षिक 1 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला.

दीपिका-रणवीरचं लग्न ही मोठी जबाबदारी होती
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्यावेळी जलालने सिक्योरिटी हेड म्हणून काम पाहिलं होतं. विशेष म्हणजे या लग्नाला फक्त 30 लोक उपस्थित होते. आजकाल दीपिका पदुकोण अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच '83' मध्ये पती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.