अन् शाहरूख समोर दीपिकाचे डोळे पाणावले....

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 28, 2017, 01:30 PM IST
अन् शाहरूख समोर दीपिकाचे डोळे पाणावले.... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्याचा नवा शो सुरू होत आहे. त्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी होतील. याची सुरूवात दीपिका पदुकोणपासून झाली. मात्र या शो मध्ये गप्पा रंगलेल्या असताना दीपिकाचे डोळे पाणावले. 

शाहरूखचा नवा शो

स्टार प्लस वाहिनीवर सुरू झालेल्या शाहरूखच्या या शो मध्ये शाहरूखने एक पत्र वाचले. ते वाचत असताना दीपिकाचे मन भरून आले आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या. हे पत्र तिची आई उज्ज्वला यांनी तिच्यासाठी लिहिले होते. 

काय होते पत्रात ?

त्यात त्या म्हणतात की, दीपिकाने तिच्या लढाया अशा पद्धतीने लढल्या आहेत की या सगळ्यात तिने तिच्या आतील प्रकाश गमावला नाही. हे ऐकून भावूक झालेल्या दीपिकाचे डोळे पाणावले.

दीपिकाचे पत्र...

दीपिका जाताना आलिया भट्टसाठी एक पत्र ठेऊन गेली आहे. पुढच्या आठवड्यात शाहरूखसोबत या शो मध्ये आलिया भट्टची वर्णी लागणार आहे.