मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या कान्स फेस्टिवलमधील तिच्या वेग-वेगळ्या लूकमुळे चर्चेत आहे. आता देखील दीपिकाची स्टाईल चाहत्यांना बेभान करत आहे. दीपिकाची स्टाईल आणि तिच्या फॅशन सेन्समुळे फक्त मुलचं नाही, तर मुली देखील अभिनेत्रीवर फिदा आहेत. सध्या दीपिकाचा कान्स फेस्टिवलमधील ग्लॅमरस लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.
दीपिकाने कान्सच्या रेड कार्पेटवर काळ्या आणि सोनेरी चमकदार बॉडीकॉन गाऊनमध्ये चाहत्यांना थक्क केलं. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींच्या यादीत दीपिकाचाही समावेश आहे.
Elvis सिनेमाच्याच्या स्क्रिनिंगसाठी हटके गाऊनमध्ये दीपिका रेड कार्पेटवर अवतरली. या भन्नाट लूकमध्ये दीपिका पाहून पाहणारे पाहतचं राहिले. दीपिकाने स्वत: तिच्या इंस्टाग्राम हँडलवर या ड्रामाटिक गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत.
तिने तिचा नवीन लूक ग्रेस उत्तम प्रकारे कॅरी केला आहे. दीपिका प्रत्येक फोटोमध्ये अप्रतिम दिसत आहे. दीपिकाला पाहून तिचे चाहते बेभान झाले आहेत.
सोशल मीडियावर तिच्या एका चाहत्याने 'जो दीपिका से जले वो जरा साईड से चले...' अशी कमेंट केली आहे. तर अन्य युजरने तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.