घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीसोबत सैफचं अफेयर, लग्न मात्र करिनाशी

अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफचे नाव 'या' अभिनेत्रीसोबत जोडले गेलं होतं मात्र 2 वर्षातच दोघांचं ब्रेकअप झालं

Updated: May 26, 2022, 10:30 AM IST
घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीसोबत सैफचं अफेयर, लग्न मात्र करिनाशी title=

मुंबईः सैफ अली खान केवळ त्याच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. सैफच्या लग्नापासून घटस्फोटाच्या बातम्या खूप गाजल्या होत्या.  घटस्फोटानंतर सैफच्या आयुष्यात ही अभिनेत्री आली. तब्बल 2 वर्ष दोघांचं अफेयर सुरू होतं

सैफ अली खानचं पहिलं लग्न 1991 मध्ये अमृता सिंहसोबत झालं होतं. हे लग्न अनेक अर्थांनी खास होतं. खरे तर लग्नाच्या वेळी अमृता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती, तर सैफने तेव्हा एकही चित्रपट केला नव्हता.

इतकेच नाही तर वयानेही सैफ अमृता सिंहपेक्षा 12 वर्षांनी लहान होता, ज्यावरून हे लग्नही खूप चर्चेत आले होते. या लग्नापासून सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले झाली. मात्र, लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये अमृता आणि सैफचा घटस्फोट झाला. 

अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफचे नाव इटालियन मॉडेल रोजा कॅटालानोसोबत जोडले गेले. रिपोर्ट्सनुसार, सैफ आणि रोजा पहिल्यांदा केनियामध्ये भेटले आणि इथेच दोघांमध्ये जवळीक वाढली. सैफनंतर रोजा भारतात आली. सैफ आणि रोजा यांचे अफेअर पूर्ण दोन वर्षे चालले, त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

सैफच्या मूड स्विंगच्या समस्येने त्रस्त झालेल्या रोजाने सैफला दूर केलं तसंच सैफ विवाहित असल्याचंही रोजाला भारतात आल्यावरच समजलं. मात्र, रोजासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफने 2012 मध्ये अभिनेत्री करीना कपूर खानसोबत लग्न केले.