दीपिका पदुकोणचं रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य म्हणाली, सेक्सशिवाय....

ब्यूटी विथ ब्रेन... या वाक्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण 

Updated: Aug 14, 2022, 05:02 PM IST
दीपिका पदुकोणचं रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य म्हणाली, सेक्सशिवाय.... title=

मुंबई : ब्यूटी विथ ब्रेन... या वाक्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone). अभिनय, सौंदर्य , बुद्धीमत्ता इत्यादी गोष्टींमुळे दीपिका कायम चर्चेत असते. दीपिकाने हातात माईक धरल्यावर ती तिच्या उत्तरांनी सर्वांना गप्प करते. याचबरोबर दीपिका 'गहरियान' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आली होती. 

ज्यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, दीपिका पदुकोणने  रिलेशनशिपमध्ये शारीरिक संपर्काचं महत्त्व सांगितलं होतं.  जे  लोकांमध्ये आज चर्चेचा विषय बनला आहे. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, दीपिका पदुकोणने अलीकडेच रिलेशनशिपमध्ये शारीरिक संपर्काचे महत्त्व सांगितलं आहे. जी सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना, दीपिका पदुकोणला विचारण्यात आलं की, ती रिलेशनशिपमध्ये शारीरिक संपर्काला किती महत्त्व देते. ज्याला उत्तर देत दीपिका पदुकोण म्हणाली की, नात्यात शारीरिक जोड आवश्यक आहे. तो एक महत्त्वाचा भाग मानता येईल. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास, जो नातेसंबंधात सर्वात महत्त्वाचं असतो. 

दोन व्यक्तींमध्ये विश्वास नसेल तर या सर्व गोष्टींना काही अर्थ नाही, असं तीचं म्हणणं आहे. यादरम्यान तिला रिलेशनशिपमधील शारीरिक संबंधांना 10 पैकी रेट देण्यास सांगितलं होतं. अशा स्थितीत तिने 7  रेटिंग दिलं आहे. कोणतंही नातं तेव्हाच तुटतं जेव्हा त्यात विश्वास नसतो.
 
दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर,  आगामी काळात ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. काहि दिवसांपुर्वी अभिनेत्रीचा 'गहरियान' रिलीज झाला. तर अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टमध्ये 'द इंटर्न', 'प्रोजेक्ट के', 'फाइटर','लव्ह 4 एव्हर'च्या नावांचा समावेश आहे. अभिनेत्रीच्या या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.