Ranveer Singh ने असं काय केलं? की दीपिका भर कार्यक्रमात त्याच्यावर भडकली

दीपिका पादुकोण जितकी शांत आहे.

Updated: Jan 21, 2022, 09:16 PM IST
 Ranveer Singh ने असं काय केलं? की दीपिका भर कार्यक्रमात त्याच्यावर भडकली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. दीपिका आणि रणवीरची जोडी चित्रपटांपासून इव्हेंटपर्यंत नेहमीच परफेक्ट दिसते. दोघांची उपस्थिती नेहमीच कार्यक्रमात बहार आणते.

दीपिका पादुकोण जितकी शांत आहे. रणवीर सिंग तितकाच मस्ती करण्यासाठी ओळखला जातो. एकदा रणवीर सिंगला त्याच्या मस्तीमुळे दीपिकाच्या रागाचा सामना करावा लागला.

बाजीराव मस्तानीच्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण एका कार्यक्रमात गेले होते, तेव्हा अभिनेत्याने असा प्रँक केला होता, ज्यावर दीपिका रागाने लाल झाली होती. दीपिका अतिशय शांत स्वभावाने मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देत होती, तेव्हा अचानक या कार्यक्रमात प्रियांका चोप्राचा आवाज आला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रियांका चोप्राही तिथे उपस्थित नव्हती, पण तिचा आवाज कुठून तरी ऐकू आला, जो ऐकल्यानंतर रणवीर सिंग खूप एक्साईटेड झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीर सिंगने दीपिका पादुकोण बोलताना मध्येच थांबवलं आणि म्हणाला- 'तू कुठे आहेस'. रणवीर सिंगच्या या मस्तीनंतर दीपिका रागाने रणवीर सिंगकडे तिरक्या नजरेने पाहत राहिली. रणवीर सिंगला समजले की दीपिकाला राग आला आहे, त्यानंतर अभिनेत्याने दीपिकाला शांत होण्यास सांगितले, 'अरे बोले बोलो डोला रे डोला बोलो...'

रणवीर सिंगची अशी मस्ती अनेकदा पाहायला मिळते. दीपिकाच्या फोटोंवरील कमेंट्सपासून ते सार्वजनिक कार्यक्रमापर्यंत रणवीर सिंग खूप मस्ती करताना दिसत आहे. रणवीर सिंग आणि दीपिकाचे 2018 मध्ये लग्न झाले होते.