VIDEO : .... आणि दीपिकाला एकटक पाहतच राहिला रणवीर

नेमकं असं काय केलं दीपिकाने 

VIDEO : .... आणि दीपिकाला एकटक पाहतच राहिला रणवीर  title=

मुंबई : इटलीत लग्नसोहळा पार पडल्यानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच पहिलं रिसेप्शनकरता बंगलुरूमध्ये झालं. या रिसेप्शनमधील दीपवीरचा पहिला फोटो समोर आला. गोल्डन साडी आणि हातात हिरव्या रंगाचा चुडा घातलेली दीपिका तर शेरवानीमध्ये रणवीर अतिशय सुंदर दिसत होते. 

तीन सिनेमांत एकत्र काम करूनही दीपिकाला आपल्या पत्नीच्या रुपात पाहून रणवीरची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तिचं सौंदर्य रणवीरला अधिक आकर्षक करत होतं. त्या सौंदर्याकडे रणवीर आकर्षित झाला होता. 

दीपिका आणि रणवीरचं बगंलुरूतील रिसेप्शन हॉटेल द लीला पॅलेसमध्ये होत आहे. आता मुंबईत या नव्या जोडीचं रिस्पेशन 1 डिसेंबर रोजी होणार असून ते हॉटेल ग्रँड हयातमध्ये होणार आहे. बंगलुरूतील रिस्पेशनजवळ पोहोचल्यावर दीपिका सर्वात प्रथम रिसेप्शन वेन्यूकडे पोहोचली. तिने पूर्ण तयारीवर एक नजर फिरवली. आजच्या रिसेप्शन पार्टीत पाहुण्यांना साऊथ इंडियन जेवण वाढलं जाणार आहे.

deepika

बंगळुरू येथील द लीला पॅलेस येथे पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्याला बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. तुलनेने यात क्रीडा विश्वातीच चेहरे जास्त प्रमाणात दिसले. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यावेळी 'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा देण्यासाठी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती.