दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून 20 वर्ष राहिला हा अभिनेता, 3 वर्षे निर्मात्यांभोवती फिरला, हॉटेल मॅनेजर झाला अन् त्या एका फोनने...

Entertainment News : फोटोमधील चिमुकला हा 90 च्या दशकातील अभिनेता आहे. चित्रपटात कधी मुख्य भूमिकेत जरी दिसला नसला तरी त्याच्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. 

नेहा चौधरी | Updated: Aug 28, 2023, 08:25 AM IST
दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून 20 वर्ष राहिला हा अभिनेता, 3 वर्षे निर्मात्यांभोवती फिरला, हॉटेल मॅनेजर झाला अन् त्या एका फोनने... title=
Deepak Tijori Birthday Special Unknown Facts wife shivani divorce fight bollywood Gossip Entertainment News

Deepak Tijori Unknown Facts : फोटोमधील अभिनेता हा 90 च्या दशकातील 'आशिकी', 'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर', 'सडक' किंवा 'कभी हान कभी ना' या गाजलेल्या चित्रपटामध्ये दिसला होता. कधी हिरोचा मित्र, तर कधी भाऊ तर कधी या अभिनेत्याने खलनायिकाचीही भूमिका साकारली. पण या चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी त्याला खूप पापड बेलावे लागले. बॉलिवूडमधील संघर्षासोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्यातही भूंकप आला होता. या अभिनेत्याचं नाव आहे दीपक तिजोरी. (Bollywood Actor Deepak Tijori) दीपक तिजोरीचा आज वाढदिवस असून तो 62 वर्षांचा झाला आहे. (Deepak Tijori Birthday) 

असं पडलं तिजोरी आडनाव!

दीपक तिजोरी हा मूळचा गुजराती आहे. त्याचे वडील गुजराती वैष्णव तर आई पारशी इराणी होती. तीन भावंडांमध्ये दीपक सर्वात लहान होता. त्यांचा आडनावमागील काहाणीदेखील मजेशीर आहे. दीपकचे पणजोबा आणि आजोबा हे तिरोजी बनवायचे म्हणून त्यांना तिजोरीवाला असं आडनाव पडलं.  मग शाळा कॉलेजात मला तिजोरी हे टोपणनाव पडलं. अन् मग काय तेव्हापासून आमचं आडनाव तिजोरी असं झालं. (Deepak Tijori Birthday Special Unknown Facts wife shivani divorce fight bollywood Gossip Entertainment News )

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by deepaktijoriteam (@deepaktijoriteam)

आईची इच्छा होती...

दीपकच्या आईला चित्रपटात काम करायचं होतं. मात्र वडिलांनी घर सांभाळण्यासाठी सांगितलं आणि आईचं स्वप्न अपूर्ण राहिलं. म्हणून तीन भावंडांपैकी एकाने तरी चित्रपटात काम करावं अशी तिची इच्छा होती. त्यातूनच मला चित्रपटात अभिनयाची आवड जडली. 

त्याकाळात गॉडफादर किंवा ओळखीशिवाय इंडस्ट्रीत पाऊल ठेवणं कठीण होतं. म्हणून त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असं दीपक यांनी सांगितलं. दुसरीकडे घराची आर्थिक स्थिती चांगली नव्हती म्हणून अनेक वेळा हा वेड सोडून नोकरी करावी असंही वाटलं. अखेर वांद्रेमधील हॉटेल सी रॉक फ्रंट ऑफिसमध्ये दीपक यांनी रात्रीचं काम सुरु केलं. 

त्यानंतर एका मासिकात विक्री प्रतिनिधी म्हणूनही दीपकने काम केलं. त्यावेळी  भरत दाभोलकर यांनी एक दिवस मॉडेलिंग करायला सांगितलं आणि तिथून मॉडेलिंगचा प्रवास सुरु झाला. मग अचानक एक दिवस अभिनेता अवतार गिलचा फोन आला आणि त्या फोनने माझं आयुष्य बदद्ल. तो म्हणाला की भट्ट साहेब तुम्हाला शोधत आहेत. दीपक महेश भट्ट यांना भेटले आणि त्यांना आशिकी चित्रपट मिळाला. 

एक वेळ अशी आली की दीपकला फक्त अभिनेत्याच्या मित्राच्या भूमिका मिळायला लागला. दीपकला यांचं वाईटही वाटलं म्हणून त्याने काम बंद केलं. 10 वर्षे काम केल्यानंतर दीपकने ब्रेक घेतला. त्यानंतर 'पहेला नशा' ची ऑफर आली. 

'उप्स' या चित्रपटातून दिग्दर्शकाच्या दुनियेत पदार्पण केलं.  या चित्रपटावरुन दीपकवर टीका झाली. हा चित्रपट अ‍ॅडल्ट नव्हता, तो एक इमोशनल सिनेमा होता, असं दीपकचं म्हणं होतं. 

वैवाहिक आयुष्यातही भूकंप!

दीपक तिजोरीचं घटस्फोट झालं पण या घटस्फोटाच्या कारणाने सगळ्यांच धक्का बसला होता. 20 वर्षांपासून जिच्यासोबत संसार केला ती त्याची पत्नी नव्हती. शिवानी तोमर यांनी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिलाच नव्हता ही बाबत 20 वर्षांनी दीपकच्या समोर आली.