हनी सिंगच्या गाण्यावर तरुणीचा धमाल डान्स, VIDEO तुम्ही पाहिला का?

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 29, 2018, 01:12 PM IST

नवी दिल्ली : 'सोनू के टिटू की स्वीटी' या आगामी सिनेमाचे आतापर्यंत दोन गाणे रिलीज झाले आहेत. दोन्ही गाणी हनी सिंगने गायले आहेत. या गाण्यांपैकी 'छोटे छोटे पेग लगा' या गाण्यावर एका तरुणीने केलेला डान्स सध्या सोशल मीडियात खूपच व्हायरल होत आहे.

प्रेक्षकांची पसंती

हनी सिंगने गायलेल्या 'दिल चोरी साडा हो गया' आणि 'छोटे छोटे पेग लगा' या दोन गाण्यांपैकी 'छोटे छोटे पेग लगा' या गाण्याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहे.

डान्स व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

इतकचं नाही तर 'छोटे छोटे पेग लगा' या गाण्याची तरुणाईवर इतकी क्रेझ आहे की सर्वचजण या गाण्यातील स्टेप्स फॉलो करत आहेत. या गाण्यातील स्टेप्स फॉलो करुन केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करत आहेत. अशाच प्रकारे एका तरुणीने डान्स करुन व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केला आहे.

हा व्हिडिओ Obsessive Dancing Disorder नावाने यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. या व्हिडिओत एक तरुणी टेरेसवर डान्स करताना दिसत आहे.

एक लाखांहून अधिकवेळा पाहिला व्हिडिओ

हा व्हिडिओ आतापर्यंत १,६८,६२७ वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ याच महिन्याच्या २१ तारखेला अपलोड करण्यात आला आहे.

हनी सिंगने गायलेलं 'छोटे छोटे पेग लगा' हे गाणं हंस राज हंस यांच्या 'बिच्छू'मधील सुपरहिट गाणं 'टोटे टोटे हो गया दिल...'वरुन घेण्यात आलं आहे. मात्र, हनी सिंगने या गाण्याची ट्यून तिच ठेवली आहे मात्र, शब्द बदलले आहेत.