ऑनस्क्रीन वडिलांच्या आठवणीने सलमान भावूक

शेअर केला हा व्हिडिओ 

Updated: Oct 8, 2019, 12:50 PM IST
ऑनस्क्रीन वडिलांच्या आठवणीने सलमान भावूक  title=

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानची 'दबंग' स्टाईल चाहत्यांना खूप पसंत आहे. चाहते सलमानच्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष देत असतात. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या 'दबंग 3' चा टीझर लाँच झाला. तर आता अशी माहिती मिळतेय की, सलमान खानच्या सिनेमाचं शुटिंग नुकतंच संपलं आहे. 

दबंग 3 सिनेमाच्या शुटिंगच्या तिसऱ्या दिवशी सलमान खानने दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना 73 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. सलमानने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणतो की, सिनेमाचं शुटिंग आजच संपलं आहे. आणि आजच विनोद खन्ना यांचा वाढदिवस आहे. आम्ही तुम्हाला खूप मीस करतो असं म्हणतं त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

सलमान म्हणतो की, आश्चर्य आणि आनंदाची गोष्ट अशी की विनोद खन्ना म्हणजे प्रजापती पांडे सरांचा आज जन्मदिन आहे. अभिनेता विनोद खन्ना यांनी 'दबंग' सिनेमात सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 

'दबंग 3' सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवा यांनी केलं आहे. आताच्या भागात विनोद खन्ना यांच कॅरेक्टर त्यांचे भाऊ प्रमोद खन्ना साकारत आहेत. यावेळी सलमान सांगतो की, वीके सर आम्हाला तुमची आठवण येते. सिनेमांत तुमचा भाऊच माझ्या वडिलांची भूमिका साकारत आहे. आम्हाला तुमची खूप आठवण येते. 

'दबंग ३' चित्रपटाबरोबरच अर्जुन कपूरचा 'पानीपत' चित्रपट ६ डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्याचबरोबर १३ डिसेंबरला अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी' आणि २७ डिसेंबरला अक्षय-करिनाचा 'गुड न्यूज' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर कोणता चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.