करीना, तब्बू आणि क्रितीच्या ‘क्रू’ चित्रपटाने रचला इतिहास, पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.  

Updated: Mar 30, 2024, 04:17 PM IST
करीना, तब्बू आणि क्रितीच्या ‘क्रू’ चित्रपटाने रचला इतिहास, पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी title=

Crew First Day Box Office Collection : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांची मुख्य भूमिका असलेला 'क्रू' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा, कलाकार आणि गाण्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट शुक्रवारी (29 मार्च) प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.  

गेल्या काही दिवसांपासून 'क्रू' या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सातत्याने प्रसिद्धीझोतात आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत महिला अभिनेत्री झळकत आहेत. त्यामुळे हा चित्रपट कॉमेडी आणि ग्लॅमरचा तडका असणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतासह जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 2024 मधील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 

'क्रू' चित्रपटाने केली इतकी कमाई

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘क्रू’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 8.75 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने जगभरात 20.7 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या चित्रपटाने इतिहास रचला आहे. यंदा 2024 या वर्षात चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर हृतिक रोशनचा 'फायटर' आणि दुसऱ्या क्रमांकावर अजय देवगणचा 'शैतान' पाहायला मिळत आहे. शुक्रवार असूनही या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. त्यामुळे येत्या वीकेंडला या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल, असे बोललं जात आहे.  

आणखी वाचा : 'मला 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवायची, कारण...'; शरद पोंक्षेंनी व्यक्त केली इच्छा

'क्रू' चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद

दरम्यान ‘क्रू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसत आहे. त्यासोबतच यात कपिल शर्मा, दिलजीत दोसांझ, सास्वता चॅटर्जी आणि राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.