Actors Cosmetic Surgery: म्हातारपण लपवण्यासाठी 'हे' अभिनेते लढवतात अशी शक्कल

प्रसिद्ध आभिनेते का दिसत नाहीत वयस्कर? त्यांच्या चमकदार चेहऱ्या मागचं रहस्य समोर    

Updated: Nov 8, 2022, 02:50 PM IST
Actors Cosmetic Surgery: म्हातारपण लपवण्यासाठी 'हे' अभिनेते लढवतात अशी शक्कल  title=

Actors Cosmetic Surgery: आपण सुंदर दिसावं अनेकांनी आपल्याकडे पाहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी आपण प्रत्येक जण अनेक उपायांचा वापर करतो. फक्त महिलाच नाही तर, पुरुष देखीव या शर्यतीत पुढे असतात. बॉलिवूडमध्ये देखील असचं आहे. ग्लॅमरस दिसण्यासाठी फक्त अभिनेत्रीचं पार्लरमध्ये जात नाहीत, तर अभिनेते देखीर हॅडसम दिसण्यासाठी अनेक पर्याय निवडतात. आज अशा अभिनेत्यांबद्दल जाणून घेवू जे म्हातारपण लपवण्यासाठी अनोख्या शक्कल लढवतात. 

अभिनेता आमिर खान (Aamir Khan)
अमिर खान चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत असतो. वयाच्या 57 व्या वर्षी देखील आमिर जवान दिसतो. रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीही केली होती.

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)
बॉलिवूडमधील फिट स्टार्समध्ये अक्षय कुमारचा क्रमांक अव्वल स्थानी आहे. पण उतारवयात अभिनेता अनेक दोष्टींचा सामना करत आहे. आता  अभिनेत्याचे केस गळू लागले आहेत. त्यासाठी अभिनेत्याने हेअर ट्रान्सप्लांटची मदत केली आहे.

अभिनेता रणबीर कपूर  ( Ranbir Kapoor)
रणबीर कपूर  नुकताच एका मुलीचा वडील झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टसोबत लग्न करण्यापूर्वी रणबीर कपूरने हेअरलाइनमध्य बदल केला होता. यासाठी अभिनेत्याने हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं.