मुंबई : संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर मत मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. भारतात लॉकडाऊनचा चैथा टप्पा आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश पूर्णपणे थांबलं आहे. छोट्या उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत सर्व काही ठप्प आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका कलाविश्वाला देखील बसला आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्व प्रॉडक्श हाऊस बंद आहेत. पण अशा आणीबाणीच्या काळात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
Here is the CORONAVIRUS film trailer..The story is set in a LOCKDOWN and it has been SHOT during LOCKDOWN ..Wanted to prove no one can stop our work whether it’s GOD or CORONA @shreyaset https://t.co/fun1Ed36Sn
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 26, 2020
राम गोपाल वर्मा यांनी लॉकडाऊनवर आधारित 'कोरोना व्हायरस' नावाचा एक चित्रपट साकारण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट करून पोस्ट केला आहे. 'कोरोना व्हायरस' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा ट्रेलर त्यांनी पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'चित्रपटाची कथा लॉकडाऊनमध्ये सेट करण्यात आली आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळातच चित्रपटाच्या ट्रेलरचे शुटींग पूर्ण करण्यात आले आहे. यावरून असं सिद्ध होतं की काम करण्यापासून कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही. मग तो देव असो किंवा कोरोना...' असं लिहलं आहे. 'कोरोना व्हायरस' चित्रपटाच्या चित्रीकरणाला लॉकडाऊननंतर सुरूवात होणार आहे.