मुंबई : पान सिंह तोमर, जॉली एलएलबी 2, पीपली लाईव्ह, स्लमडॉग मिलिनेयर, बँडिट क्वीन सारख्या सिनेमामध्ये काम केलेल्या सीताराम पंचाल हे मागील ३ वर्षापासून कॅन्सर या आजारापासून ग्रस्त आहेत. त्यांच्या प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांची आर्थिक स्थिती देखील नाजूक आहे. त्यांनी सोशल मीडियावर मदतीसाठी मदत मागितली आहे.
सीताराम हे मागील काही महिन्यांपासून बेडवर आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने दवाखान्याचा खर्च देखील त्यांना कठीण झाला आहे. फेसबूकवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. एक काळात ज्यांनी अभिनयाने अनेकांची मनं जिंकली तो कलाकार आज हालाकीचं जीवन जगतोय. त्यांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधले अनेक कलाकारा आता समोर येत आहेत.
सीताराम जवळपास ३ वर्षांपासून कँसरशी संघर्ष करत आहेत. त्यांचं शरीर खूपच कमजोर झालं आहे. त्यांचं शरीर इतर औषधे नाही सहन करु शकत म्हणून ते आयुर्वेदीक उपचार घेत आहेत. त्यांना उपचार घेणं देखील आता अवघड झालं आहे. आर्थिक मदतीसाठी आता पैसे जमवले जात आहेत.