मुंबई : कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) ला कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. भारती आणि हर्ष यांच्यावर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या (Mumbai) किल्ला कोर्टात भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) यांना सादर करण्यात आलं. भारती आणि हर्ष यांच्यावर गांजा सेवनाचा आरोप आहे. या दोघांना एनडीपीएस (NDPS) एक्टच्या कलम २७ अंतर्गत अटक करण्यात आलीय.
कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्षला देखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. . ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने धाड टाकली होती.
एनसीबी त्यांचा घरात आणि कार्यालयात धाड टाकल्यानंतर ८६.५ ग्रॉम ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. शिवाय गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दोघांनी दिली आहे.
दरम्यान, ड्रग्स प्रकरणी याआधी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर निर्माता फिरोझ नाडियादवालाची पत्नी शबाना यांना देखील अटक करण्यात आली होती. तर याप्रकरणी अनेकांचे जबाब देखील नोंदवले गेले आहेत.