कॉमेडियनच्या हार्ट अटॅकबद्दल कळताच सलमान खानने उचलंल मोठं पाऊल

सलमान खान स्वतः सुनील ग्रोव्हरच्या तब्येतीची काळजी करत आहे.

Updated: Feb 5, 2022, 07:09 PM IST
 कॉमेडियनच्या हार्ट अटॅकबद्दल कळताच सलमान खानने उचलंल मोठं पाऊल title=

मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सध्या आजाराला तोंड देत आहे. सुनील ग्रोव्हरवर नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एका वेब सीरिजच्या शुटिंगदरम्यान सुनील ग्रोवरला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा तपासणीनंतर डॉक्टरांनी चार ब्लॉकेजेस सांगितले होते.  त्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले. 

यानंतर सुनील ग्रोवरच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली, या शस्त्रक्रियेनंतर आता स्वतः सलमान खानने को-स्टार सुनील ग्रोव्हरच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.एका रिपोर्ट्सनुसार, एका वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सुनील ग्रोव्हरला हृदयविकाराचा झटका आला होता.

सलमान खान स्वतः सुनील ग्रोव्हरच्या तब्येतीची काळजी करत असून त्याने त्याच्या डॉक्टरांच्या टीमला सुनीलच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

सलमान खानच्या डॉक्टरांची एक टीम अभिनेत्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 'बीइंग ह्युमन'सोबत काम करत आहे. सलमानने त्याच्या डॉक्टरांच्या टीमला सुनील ग्रोव्हरच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.