'पुष्पा' सिनेमाच्या यशानंतर रश्मिका मंदान्नाकडून चाहत्यांना  गुडन्यूज

'पुष्पा : द राइज' या चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदान्ना एका वेगळ्या उंचीवर पोहचली आहे.

Updated: Feb 5, 2022, 06:40 PM IST
'पुष्पा' सिनेमाच्या यशानंतर रश्मिका मंदान्नाकडून चाहत्यांना  गुडन्यूज title=

मुंबई : 'पुष्पा : द राइज' या चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदान्ना एका वेगळ्या उंचीवर पोहचली आहे. रश्मिका कन्नड, तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चार भाषांमध्ये काम करण्यासाठी तिला नॅशनल अभिनेत्री मानलं जातं. रश्मिकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2016 च्या कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'मधून केली. ज्या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या सिनेमासाठी तिला 'दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळाला होता. 

रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रशही म्हणतात. त्याचबरोबर 'पुष्पा: द राइज'च्या यशानंतर रश्मिका खूप आनंदी दिसत असून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिची मागणीही प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत, तिच्या चित्रपटाच्या यशानंतर, तिने आपली फी देखील वाढवली आहे. नुकतंच रश्मिकाने स्वत:च घर देखील घेतलं आहे. ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या फोटोनंतर चाहते तिचं जोरदार अभिनंदन करत आहेत.

तिने स्वतः ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. रश्मिका मंदान्नाने तिच्या इन्स्टा स्टोरीद्वारे याबद्दलची माहिती दिली. तिने एक व्हिडिओ शेअर करत तिच्या नवीन घराची झलक दाखवली आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं आहे की, 'शिफ्टिंग करणं सोपं नाही, पण मला जेव्हा माझं काम करायचं असतं. तेव्हा ते करायला मला खूप आवडतं. मी मस्करी करत नाही.'

रश्मिका मंदन्नाच्या पोस्टमध्ये काही पॅकिंग बॉक्स दिसत आहेत, ज्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, अभिनेत्री शिफ्टींग करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्नाने नुकतंच मुंबईत एक नवीन घर घेतलं आहे. जेणेकरून तिला बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठी वेळेवर पोहोचता येईल. रश्मिका या आधी हैदराबादमध्ये राहत होती.