Raju Srivastava : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava passes away in Delhi) यांचं आज सकाळी निधन झालं आहे. आपल्या कॉमेडीने भल्याभल्यांना पोट धरायला लावणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनोख्या विनोदाने राजू श्रीवास्तव यांनी लोकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र, तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, राजू श्रीवास्तव फक्त कॉमेडीतच नाही तर राजकारणात देखील होते. (Comedian Raju Srivastava had a cabinet rank minister)
कॉमेडीमध्ये आपला वट निर्माण केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. 2012 साली राजू समाजवादी पक्षासोबत (SP) जोडले गेले. त्यानंतर 2014 साली देशात मोदी लाट सुरू असताना राजू श्रीवास्तव यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट देखील देण्यात आलं होतं. मात्र, अखेरीस त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि तिकिट परत केलं.
समाजवादी पक्षात असताना राजू श्रीवास्तव यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यादव यांनी माझ्या समस्येवर अॅक्शन घेतली नाही, असं खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतला. 2014 साली देशात मोदी लाट असताना राजू श्रीवास्तव नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या धुवांधार प्रचारामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांना स्वच्छ भारत अभियानासाठी ब्राँड अँबेसेडर करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर पक्षाने त्यांना स्टार प्रचारक देखील केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राजू श्रीवास्तव यांच्या खांद्यावर सोपवली. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मचा विकास झाला पाहिजे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे.
दरम्यान, मिमिक्रीचा उत्तम सेन्स यामुळे राजू श्रीवास्तव अनेकांचे चाहते झाले. आल्या अंगभूमिस साजेशी मिमिक्री करून लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. भारतासह जगभरात देखील त्यांचे चाहते आहेत.