बापरे! अस्वलानं घेतलं कोकेन; दोन मिनिटांत असा झिंगला की.... Video Viral

काही कठोर कायदे यासाठी तयारही केले जात आहेत. पण, तरीसुद्धा Drugs तस्करी आणि त्याचा वापर मात्र काही केल्या थांबताना दिसत नाही. 

Updated: Dec 12, 2022, 09:09 AM IST
बापरे! अस्वलानं घेतलं कोकेन; दोन मिनिटांत असा झिंगला की.... Video Viral  title=
Cocaine Bear Movie trailer Video know about the real incident

Cocaine Bear : अमली पदार्थांचा नशा करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी आणि कायदेशीर पातळीवर अनेक पावलं उचलली जात आहेत. काही कठोर कायदे यासाठी तयारही केले जात आहेत. पण, तरीसुद्धा Drugs तस्करी आणि त्याचा वापर मात्र काही केल्या थांबताना दिसत नाही. अचानकच पुन्हा हा मुद्दा प्रकाशात येण्याचं कारण म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडीओ आणि एक अशी घटना ज्यामुळं संपूर्ण जगालाच हादरा बसला आहे. (Cocaine Bear Movie trailer Video know about the real incident)

कधी घडली ही घटना? 

सप्टेंबर 1985 मध्ये जॉर्जियामध्ये ही खळबळजनक घटना घडली होती. ज्यामध्ये 175 पाऊंड म्हणजेच 80 किलो वजनांच्या एका अस्वलानं तस्करी केल्या जाणाऱ्या ड्रग्सचं सेवन केलं होतं. यानंतर जे झालं ते अनेकांच्याच जीवावर बेतणारं होतं. 1985 मध्ये तपास अधिकाऱ्यांनी ड्रग्ज तस्कर आणि माजी पोलीस अधिरकारी अँड्र्यू थॉर्नटन यांचे मृतदेह ताब्यात घेतले. यावेळी अँड्र्यू यांनी पॅराशूट आणि लोफर्स घातल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या कमरेला एक बॅग बांधली होती, ज्यामध्ये 34 फुटबॉलच्या आकाराचे कोकेनचे गठ्ठे होते. त्यावेळी असं म्हटलं गेलं की, थॉर्नटन कोलंबियाला जाणाऱ्या एका ड्रग्जनं भरलेल्या विमानातून प्रवास करत होते. या विमानातून चुकून कोकेन जंगलात पाडले गेले जे घेण्यासाठी ते तिथे आले होते. 

सदर माहिती हाती लागल्यानंतर पोलिसांनी त्या भागात तपास सुरु केला आणि काही महिन्यांना त्यांना एक रिकामी बॅग मिळाली. आश्चर्यानं या बॅगेमध्ये अस्वलाचे अवशेष मिळाले होते. असं म्हटलं गेलं की मल्टी-मिलियन हाय असल्यामुळं त्या अस्वलाचा मृत्यू झाला होता. या अस्वलापाशी कोकेनची 40 फाटलेली पाकिटं मिळाली होती. जंगलात पडलेले ड्रग्ज त्या अस्वलानं खाल्ले होते. ज्यानंतर त्याला Pablo EskoBear असंही नाव देण्यात आलं होतं. 

अस्वलाचा धुडगूस

पुढे समोर आलेल्या अहवालातून अस्वलाच्या रक्तात तीन ते चार ग्राम कोकेन असल्याची बाब सर्वांनाच खडबडून जागं करुन गेली. जाणून आश्चर्य वाटेलस पण अस्वलाकडे 88 पाऊंड म्हणजेच 40 किलो कोकेन सापडलं होतं. याची किंमत साधारण 20 मिलियन डॉलर म्हणजेच 165 कोटींच्या घरात होती. कोकेनची पाकिटं फाडून ते काऊंटी हिल परिसरात पसरवण्यापासून ते खाण्यापर्यंतचे प्रताप अस्वलानं केले आणि यातच त्याचा मृत्यू धाला होता. नशेच्या आहारी गेलेल्या या अस्वसानं एकच धुडगूस माजवला होता. त्याचं अक्राळविक्राळ रुप समोरच्याला धडकी भरवणारं होतं. 

याच थरारक घटनेवर साकारला गेलाय चित्रपट... 
या सत्यघटनेचा आधार घेत Cocaine Bear हा चित्रपट साकारला गेला आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या प्रसंगांव्यतिरिक्त दिग्दर्शकानं स्वातंत्र्य घेत कलात्मक जोडही दिली आहे. जिथं अस्वल मानवी वस्तीवर हल्लेही करताना दाखवण्यात आलं आहे. 24 फेब्रुवारी 2023 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्हाला हा थरार पाहायला आवडेल का?