100 टक्के क्षमतेने सुरू होणार चित्रपटगृह; जाणून घ्या नियम

गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने सर्वच चित्र बदललं.  

Updated: Jan 31, 2021, 01:14 PM IST
100 टक्के क्षमतेने सुरू होणार चित्रपटगृह; जाणून घ्या नियम title=

मुंबई : गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने सर्वच चित्र बदललं. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात एका अदृश्य पण महाभयंकर कोरोनाने थैमान घातलं. यामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. चित्रपटसृष्टीला देखील मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. पण आता हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. आता केंद्र सरकारने चित्रपटगृह 100 टक्क्यांनी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात 50 टक्के उपस्थितीच्या आधारावर चित्रपटगृह सुरू करण्यात आली होती.

मात्र 1 फेब्रुवारीपासून 100 टक्क्यांनी चित्रपटगृह सुरू करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीतील मंडळींना दिलासा मिळाला आहे. मात्र सरकारने घालून दिलेल्या अटी आणि निर्देशांनुसार चित्रपटगृह सुरू करण्यात येणार आहे. 

सरकारने घालून दिलेल्या अटी आणि निर्देश
-  सोशल डिस्टंसिंगची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
-  चित्रपटगृहामध्ये मास्क लावणे अनिवार्य आहे. 
- प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी चित्रपटगृहांमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी प्रेत्येक व्यक्तीचे शरीर तापमान पाहिले जाणार आहे. 
- चित्रपटगृहाच्या प्रवेश द्वाराजवळ आणि बाहेर जाण्याच्या मर्गावर सेनिटायझरची सुविधा असायला हवी.
- प्रत्येक प्रेक्षकांच्या स्मार्ट फोनमध्ये आरोग्य सेतू ऍप बंधनकारक आहे.