CID मधील दयाला का आला राग...

सोनी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय शो सीआयडी 27 ऑक्टोबरपासून बंद होत आहे. या शोला 21 वर्षे झाली आहेत. अचानक हा शो बंद केल्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आणि कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील कलाकारांनाही कळत नाही की सोनी वाहिनीने असा निर्णय का घेतला आहे. 

CID मधील दयाला का आला राग...  title=

मुंबई : सोनी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय शो सीआयडी 27 ऑक्टोबरपासून बंद होत आहे. या शोला 21 वर्षे झाली आहेत. अचानक हा शो बंद केल्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आणि कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील कलाकारांनाही कळत नाही की सोनी वाहिनीने असा निर्णय का घेतला आहे. 

सीआयडीमधील पोलीस दया म्हणजे दयानंद शेट्टीदेखील शो बंद होण्यामुळे नाराज झाले आहेत. एका मुलाखतीत दयानंद शेट्टीने सांगितलं की, आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. प्रत्येकजण हे ऐकल्यापासून नाराज आहे. त्यांना शो बंदच करायचा होता तर त्यांनी दुसरा मार्ग स्विकारायला हवा होता. अचानक हा निर्णय घेतल्यामुळे काहीच सुचत नाही. 

कलाकारांना याची माहिती असा प्रश्न विचारला असता, आम्हाला 12 ऑक्टोबरला याबाबत माहिती देण्यात आली. सोनीने आम्हाला सांगितलं की, यापुढे एपिसोड शूट करण्याची काही आवश्यकता नाही. आम्हाला कळलंच नाही की, त्यांनी एवढा मोठा निर्णय असा कसा घेतला. आम्ही सतत शुटिंग करत होतो पण अचानक हे ऐकायला आलं. आम्हाला असं वाटतं की, आम्हाला कुणी तरी ब्रेक लावला आहे.