मुंबई : बॉलिवुड अभिनेत्रींच्या आरोपनंतर आता दक्षिण भारतातील अभिनेत्री देखील आवाज उठवत आहेत. अभिनेत्री अमाला पॉलने दिग्दर्शक सुजी गणेशनवर यौन शोषणाचा आरोप केला आहे. गणेशनवर लीनाने केलेल्या आरोपांचं समर्थन करत तिने वक्तव्य केले आहे. अमाला पॉलने सुजी गणेशनच्या सिनेमात मुख्य भूमिका केली होती.।
अभिनेत्री अमाला पॉलने म्हटलं की, 'सिनेमाच्या शूंटीग दरम्यान तो डबल मीनिंगमध्ये बोलायचा. चुकीचे आरोप आणि चुकीच्या पद्धतीने बोलायचा. या सिनेमादरम्यानचा माझा अनुभव फार वाईट होता. चुकीची नैतिक मुल्य आणि महिलांना कमी लेखणारा असे आरोप अमालाने गणेशनवर केले आहेत.
यानंतर तिने ट्विट करत म्हटलं की, 'सुजी गणेशन आणि त्याच्या पत्नीने मला कॉल करुन चुकीच्या पद्धतीने वार्ता केली. आय़ुष्यातला हा सर्वात मोठा धक्का होता. सुजी आणि मंजरी गणेशनने आता कॉल केला आणि मी माझी भूमिका स्पष्ट केली. मी बोलत असताना त्याची पत्नी चुकीची भाषा बोलू लागली आणि मग दोघे हसत होते.'
लीना मनीमेकलईने मागच्या वर्षी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत 2005 मध्ये यौन शोषण झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता तिने नाव घेऊन गणेशनवर आरोप केला आहे.