मुंबई : अभिनय क्षेत्रातील श्रेया बुगडेचा प्रवासा हा थुकरट वाडीतल्या इतर कलाकारांपेक्षा थोडा वेगळा आहे. तिने अभिनयक्षेत्रातच काम करावं अशी तिच्या आई आणि वडील दोघांचीही इच्छा होती. त्यामुळे अभिनेत्री बनण्यासाठी श्रेयाची तयारी लहानपणापासून सुरु झाली. तिने अनेक बालनाट्यं केली. तिला साहित्यातून Literature तिचे पदवीधर शिक्षण पूर्ण करायचे होते. परंतू तिला नाटकाच्या तालिमेमुळे सगळे लेक्चर बसणे शक्य नव्हते, त्यामुळे मग तिने सोशोलॅाजीमधून पदवी घेतली.
श्रेया बुगडेने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगिले की, "तिच्या आईला अभिनयाची आवड होती. तिच्या आईने लहानपणी एक नाटकही केले होते. परंतू 19 व्या वर्षी तिचे लग्न झाल्यामुळे तिला तिची कला जपणे शक्य झालं नाही. वडीलांनाही नाटकाची आवड असल्यामुळे त्या दोघांनी आपल्या मुलांना अभिनय क्षेत्रात टाकायचे असा निर्णय घेतला. माझ्या मोठ्या बहिणीचा कल अभ्यासाकडे जास्त असल्यामुळे ती अभिनयक्षेत्रात आली नाही. पण माझ्यातील लक्षणे ओळखून मग त्या दोघांनीही मला या क्षेत्रात पुढे आणण्याचा निर्णय घेतला."
चला हवा येऊ द्या, या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.