मुंबई : 'चला हवा येऊ द्या' हा कॉमेडी शो सध्या महाराष्ट्रासह देशाभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या कार्यक्रमातील लाडक्या विनोदवीरांच्या भन्नाट कल्पना शक्तीला काही तोड नाही. त्यामुळे या कार्यक्रमाची सगळीकडेच हवा पाहायला मिळते. त्यात या शोमधील प्रत्येक कलाकारांचं आपलं वेगळं हास्याचं टायमिंग आहे. गेली कित्येक वर्ष ही टीम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतेयं.
या कार्यक्रमातील निलेश साबळेपासून ते श्रेया , कुशल बद्रिकेपर्यंत सर्व मंडळी धम्माल उडवून देतातच पण त्याच बरोबर सोशल मिडीयावरुन सुद्धा चाहत्यांवर हास्याचे कारंजे उडवत असतात. आताही कुशल बद्रिकेच्या भन्नाट पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सध्या सोशल मिडियावर विविध फिटनेस चॅलेंज जोरात सुरु आहेत. अशावेळी अनेकजण स्वत:चे फिटनेस रुटीन चाहत्यांशी शेअर करताना दिसत आहेत. पण कुशलला या सगळ्याचं टेन्शन आलंय. त्यामुळे चिंतेत असलेल्या कुशलने एक हटके प्रश्न थेट पोस्ट करत नेटकऱ्यांना केलाये.
कुशल आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, " मी खुप चिंतेत आहे. मी जर व्यायाम आणि योगाचे फोटो पोस्ट केले नाहीत तर हा सोशल मिडिया समाज मला स्विकारेल का?’ त्याच्या या अतरंगी पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत.