वाढदिवसाच्या दिवशी का झाला रिया चक्रवर्तीचा अपमान?

बालकाच्या इलाजासाठी रियाने हा व्हिडिओ शेअर करत जास्तीत जास्त मदत करण्यास सांगितलं आहे.

Updated: Jul 2, 2021, 07:39 AM IST
वाढदिवसाच्या दिवशी का झाला रिया चक्रवर्तीचा अपमान? title=

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा धारेवर घेतलंय. नुकताच रियाचा वाढदिवस झाला. पण या दिवशी देखील रियाला चांगलच ट्रोल करण्यात आलंय. यूजर्सने 'तुझी ही इमेज कधीच बदलणार नाही' अशा स्वरुपाच्या कमेंट्स केल्या आहेत.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याला 1 वर्ष पुर्ण होत असताना रिया सोशल मीडियावर हळूहळू अॅक्टीव्ह होताना दिसतेयं. पण लोकांच्या मनात तिच्या बद्दल तयार झाली इमेज काही बदलण्याचं नाव घेत नाहीये.अद्याप लोक तिचा द्वेषच करताना दिसतायेत. 

अजूनही यूजर्स रियाच्या प्रत्येक पोस्टवर निशाणा साधताना दिसतायेत. वाढदिवसानिमित्त रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदतीची मागणी केली..मात्र लोकांनी दया न दाखवता तिला पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली.

रियाने नुकताच एका लहान मुलाचा व्हिडिओ शेअर करत मदत करण्याचं आवाहन केलं होतं. हे बाळं फक्त एक वर्षाचं आहे. पण इवल्याशा वयात त्याला आयुष्य जगण्यासाठी लढाई करावी लागतेय. या बालकाच्या इलाजासाठी रियाने आपला एक व्हिडिओ शेअर करत जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केलीये. पण रियाने मदतीसाठी केलेली पोस्ट अनेकांना काही आवडलेली नाहीये. ही पोस्ट समोर येताच तिला कमेंट करत ट्रोल करण्यात आलंय.

त्यातील एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, की लोकांच्या मनात चांगली इमेज तयार करण्यासाठी ही तुझी नवी स्टॅटर्जी आहे का ? , तर काहींनी 'मुलाचा आसरा घेऊन तुझ्या बद्दलची इमेज चेंज होणार नाही' असं देखील म्हटलंय.

एकूणच काय तर, सुशांत सिंग राजपूत केसला 1 वर्षाहून अधिक काळ उलटला असलं तरी नेटकऱ्यांनी अद्याप रियाला माफ केलेलं नाहीये.