'राबता'च्या त्या दृष्यांवर सेन्सॉरची कात्री

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी राबता चित्रपट  शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.

Updated: Jun 7, 2017, 11:26 PM IST
'राबता'च्या त्या दृष्यांवर सेन्सॉरची कात्री title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी राबता चित्रपट  शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधीच सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील अनेक दृश्यांवर कात्री चालवली आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मागच्या  आठवड्यात हा सिनेमा पाहिला आणि चित्रपटातील काही दृश्य हटवण्याचा निर्णय घेतला. या सिनेमात अनेक शिव्यांचा वापर केला आहे, जे दाखवणं शक्य नाही, असं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे.  

इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना कृती आणि सुशांतचा सिनेमातील किसही फार हॉट वाटला. त्यामुळेच त्यांनी या सीनवरही कात्री चालवली. सिनेमातील सीन हटवा अन्यथा सिनेमाला ए सर्टिफिकेट देऊ असा दमच सेन्सॉरने निर्मात्यांना दिला होता.