'तू कॉम्प्रोमाईझ करशील का?' 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील 'या' अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Oct 17, 2022, 06:23 PM IST
'तू कॉम्प्रोमाईझ करशील का?' 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील 'या' अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली. कला विश्वात बऱ्याच अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. अशात या मालिकेत शेफाली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटेनं तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

हेही वाचा : अभिनेत्री उर्वशी रौतेलानं या कारणासाठी कापले केस, कारण जाणून बसेल धक्का

काजल आणि प्रार्थना बेहेरेनं 'बस बाई बस' या लोकप्रिय शोमध्ये हजेरी लावली होती.  त्यावेळी तिनं करिअरच्या सुरुवातीला आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. यावेळी काजलला शोमधील महिलेने 'कोणाला कधी नागपूरी मुलीचा इंगा दाखवला आहे का?', असा प्रश्न विचारला. 

हेही वाचा : Koffee With Karan मध्ये दिलं जाणारं गिफ्ट हॅम्परची किंमत लाखोंमध्ये? पाहून तुम्हालाही बसेल धक्का

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी या प्रश्नाचे उत्तर देतान काजलनं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा सांगितला. 'मुंबईत करिअर करण्यासाठी आल्यानंतर मी एका ठिकाणी ऑडिशन द्यायला गेले होते. त्या निर्मिती कंपनीतील एका माणसानं मला सरळ विचारलं की तू कॉम्प्रोमाईझ करशील का? हे ऐकल्यावर मी त्याच्या कानाखाली दिली. त्याला म्हणाले, यापुढे असं कोणत्याही मुलीला विचारलं तर तुझी खैर नाही.'

हेही वाचा : 'आमचं नात कायम...', रतन टाटा यांच्या आयुष्यातील 'तिचं' पहिल्यांदाच जाहिर वक्तव्य

पुढे याविषयी सांगताना काजल म्हणाली, 'त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. एकटीच तिथे असल्यामुळे मी माझ्या मित्राला फोन करुन बोलवून घेतलं. जर या माणसाने काही चुकीचं केलं तर माझा मित्र माझ्याबरोबर असेल. तिथून निघाल्यानंतर मी घरी येऊन खूप रडले. मी यापूर्वी याबद्दल ऐकलं होतं, पण असं कोणी कसं काय विचारू शकतं, हे मला कळतच नव्हतं.'