इतर बहिणींप्रमाणे सारा अली खाननेही लावलं भावाला कामाला

या फोटोत आहे खास गंमत 

Updated: Oct 30, 2019, 10:22 AM IST
इतर बहिणींप्रमाणे सारा अली खाननेही लावलं भावाला कामाला title=

मुंबई : नुकतीच भाऊबीज पार पडली. बहीण-भावाचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा खास असतं. तुझं-माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना अगदी असंच काहीसं. कितीही भांडले, कितीही रागावले तरी एकमेकांपासून करमत नाही हेच खरं. बहीण कितीही मोठी असली तरीही तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी भाऊ हा लागतोच हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 

अभिनेत्री सारा अली खानने इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो हे स्पष्ट करत आहे. दिवाळीच्या सणाच्या सेलिब्रेशनचे फोटो साराने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंमधील एक फोटो अतिशय खास आहे. या फोटोत सारा अगदी पूर्ण तयार झाली आहे आणि तिचा फोटो इब्राहिम काढत आहे. फोटो काढतानाचा इब्राहिम देखील आरश्यामुळे फोटोत कॅप्चर झाला आहे. हा पूर्ण क्षण त्या फोटोत स्पष्ट दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सणांना किंवा खास तयार झाल्यावर सगळ्यांना सोनेरी क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतात. खास करून मुलींना आणि महिला वर्गाला फोटो काढण्याची हौस असते. याला सारा देखील काही अपवाद ठरलेली नाही. साराने देखील आपला फोटो काढण्यासाठी इब्राहिमला गिऱ्हाईक बनवलं आहे. 

साराच्या या फोटोला खूप लाईक्स मिळाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या साराने देखील आपल्या भावाला देखील सोडलेलं नाही हे यावरून कळतंय. या फोटोत इब्राहिमही तितक्याच आवडीने आपली बहिण साराचा फोटो काढताना दिसत आहे. सारा आणि इब्राहिमचे एकमेकांसोबत खूप छान बाँडिंग आहे. हे अनेकदा स्पष्ट झालं आहे.