Deepika-Ranveer ने मुंबईत खरेदी केलेलं आलिशान घर पाहिलंत का? पहिल्यांदाच Video आला समोर

Deepika-Ranveer च्या नवीन Brand New Home चा Video आला समोर, पाहिला का?

Updated: Nov 25, 2022, 06:43 PM IST
Deepika-Ranveer ने  मुंबईत खरेदी केलेलं आलिशान घर पाहिलंत का? पहिल्यांदाच Video आला समोर  title=
Brand New house bought by Deepika Padukone Ranveer singh in Mumbai The video came out for the first time nz

Ranvir Singh New Apartment:  दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे प्रसिद्ध बॉलिवूड कपल (Bollywood Couple) पैकी एक आहेत. त्या दोघांनी त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन (Entertainment) केले आहे. हे दोन्ही कलाकार सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच सक्रिय (Active) असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये त्या दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना उधाण आलेलं होतं. हे दोन्ही कलाकार लग्नानंतर ही वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पण हे कलाकार वेगळे जरी राहत असले तरी ते एक कपल म्हणून एकमेकांसोबत खूप छान दिसतात. नुकतेच दोघांनी मुंबईत एक आलिशान घर घेतले आहे. त्याच्या फ्लॅटचा (Flat) एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. (Brand New house bought by Deepika Padukone Ranveer singh in Mumbai The video came out for the first time nz)

दीपिका-रणवीरचा घरचा व्हिडिओ

24 नोव्हेंबर रोजी पापराझींने (Paparazzi) दीपिका-रणवीरच्या नवीन घराचा व्हिडिओ शेअर (Video Share) केला होता. दीपवीरचे (deepveer) नवीन घर सध्या तयार होत असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्या इमारतीच्या गेटसमोर एक एलईडी आहे, ज्यामध्ये ते बांधल्यानंतर त्यांचे घर कसे दिसेल हे स्पष्टपणे दिसत आहे.

 

गृहप्रवेश (home entry) पूजेचे फोटो समोर 

ऑगस्टमध्ये, रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या घरातील गृह प्रवेश पूजेचे फोटो शेअर केले होते जे इंटरनेटवर व्हायरल (Photo Viral) झाले होते. फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका हवन करताना दिसले. त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

दीपिका-रणवीर 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये 

दीपिका-रणवीर त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी (Personal life) ठेवतात. त्यांना एकमेकांसोबत राहून 10 वर्षे झाली आहेत. रणवीरने एका मुलाखतीत (Interview) सांगितले होते की, तो आणि त्याची पत्नी दीपिका 2012 पासून रिलेशनशिपमध्ये (relationship) आहेत. बॉलीवूडच्या या आवडत्या जोडप्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत, पण दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. ते नेहमीच सोशल मीडियावरुन एकमेकांच्या नवीन प्रोजेक्ट्सना प्रेरित करत असतात. हल्लीच दीपिकाने तिच्या स्किन केअर ब्रँडची घोषणा केली होती. तिच्या या नवीन प्रवासाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आणि तिचे कौतूक ही केले. चाहत्यांना त्या दोघांनाही मोठ्या पडद्यावर पाहायची इच्छा आहे.