Shah Rukh Khan मोठ्या अडचणीत अडकण्याची शक्यता, वाचा काय आहे प्रकरण

'या' अभिनेत्रीमुळे शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता? नक्की काय आहे प्रकरण   

Updated: Aug 14, 2022, 10:47 AM IST
Shah Rukh Khan मोठ्या अडचणीत अडकण्याची शक्यता, वाचा काय आहे प्रकरण  title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान येत्या काही दिवसांनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या मागे कारण आहे अभिनेत्याचा आगामी सिनेमा 'पठान'. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाणवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड (#BoycottPathan Trend On Twitter) सोशल मीडियावर सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानचा कमबॅक सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच अडचणीत सापडला आहे. नुकताच आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षयचा 'रक्षाबंधन' सिनेमा #Boycott करण्यात आला आहे. 

सध्या  शाहरुखच्या सिनेमाला लोक Boycott का करत आहेत, याच कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण अनेक यूजर्स दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचं कारण सांगत आहेत. अशात दीपिकामुळे शाहरुख आणि 'पठाण' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकू शकतो.

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा पठाण 25 जानेवारी 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

दरम्यान, सध्या प्रदर्शनापूर्वी सिनेमाला होत असलेला विरोध पाहता, सिनेमाच्या संपूर्ण टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण Boycott झाल्यानंतर 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे शाहरुखच्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.