मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच चित्रपटाचे अनेक स्क्रिन्स रद्द झाल्याचीही माहिती समोर आली होती तर काही ठिकाणी शोला प्रेक्षकांची गर्दी नसल्याचे दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांनी त्याचा आगामी चित्रपट 'टाइगर 3' (Tiger 3)मधून किंग खान म्हणजेच शाहरुख खानला (Shahrukh Khan) बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे. एवढंच काय तर अनेकांनी शाहरुखला पनवती असल्याचे म्हटले आहे.
YRF स्टुडिओला टॅग करत अनेक चाहत्यांनी सलमानच्या आगामी चित्रपटातील पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेतून शाहरुखला काढून टाकण्याची मागणी केली आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीट करत, '@yrf आम्हाला चाहत्यांना एक नम्र विनंती करायची आहे की शाहरुख खानला टायगर 3 मधून काढून टाकावे. या पनवतीमुळे चित्रपट फ्लॉप होणार.'
Please @yrf a humble request from fans remove Srk from #Tiger3 don't want this panoti to ruin the film
— Likith Shetty (@Being_Likith) August 11, 2022
Shooting has not started yet so this is the right time...@yrf please remove @iamsrk 's cameo from the #Tiger3
#WeDontWantSRKinTiger3— Simien montiero (@SimienMontiero) August 11, 2022
दुसरा नेटकरी म्हणाला,'अजून चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही, त्यामुळे ही योग्य वेळ आहे शाहरुखला काढून टाका. तिसरा नेटकरी म्हणाला,'भाईला कोणाचीही गरज नाही, त्याचा चित्रपट ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी तो एकटा पुरेसा आहे. शाहरुखला टायगर 3 मधून बाहेरचा रस्ता दाखवा.'
we know that sk is very big and kind hearted man he always ready to help ppl but this time cost is too much and unaffordable for us, so as sk''s well wishers, we're requesting to sk that bhai please don't bring srk in tiger 3@BeingSalmanKhan @yrf #WeDontWantSRKinTiger3
— pranav (@BeingPranav09_) August 11, 2022
True instead bring Hrithik as Kabir #WeDontWantSRKinTiger3
— arslan (@BeingArslann) August 11, 2022
True instead bring Hrithik as Kabir #WeDontWantSRKinTiger3
— arslan (@BeingArslann) August 11, 2022
सलमान खानचा 'टाइगर 3' हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.