‘फुकरे रिटर्न्स’चा Box Office वर धमाका, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.

Updated: Dec 11, 2017, 03:22 PM IST
‘फुकरे रिटर्न्स’चा Box Office वर धमाका, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई title=

मुंबई : ‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. आधीच्या सिनेमाच्या तुलनेत या सिनेमाला समीक्षकांनी पसंती दिली नसली तरी प्रेक्षकांचा या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

‘फुकरे रिटर्न्स’ने पहिल्या दिवशी एकूण ८.१० कोटी रूपयांची कमाई केली. तेच दुस-या दिवशी या सिनेमाने एकूण ११.३० कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर रविवारी या सिनेमाने तब्बल १२.८० कोटी रूपयांची कमाई करत धमाल केली. प्रसिद्ध सिने समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विटनुसार या सिनेमाने एकूण ३२.२० कोटी रूपयांची कमाई केली आहे.  

भोली पंजाबनची जादू कायम

गेल्या तीन दिवसांची कमाई आणि लोकांचा प्रतिसाद पाहता सोमवारीही सिनेमा चांगली कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सिनेमातील रिचा चड्ढाने साकारलेली भोली पंजाबन आणि वरूण शर्मा याची भूमिका खास आकर्षण ठरत आहे. धमाल कॉमेडीच्या माध्यमातून या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे.

मृगदीप सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात ऋचा चड्ढा, वरूण शर्मा, पुलकित सम्राट, अली फजल, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि विशाखा सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत.