'सिनेमा' हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. याच समाजाचा भाग असलेले तृतीयपंथांबद्दल बरेचसे समज गैरसमज असताना बॉलिवूडमध्ये आलेल्या 'लक्ष्मी' सिनेमाने तृतीयपंथी समाजाची बाजू मांडली. हा सिनेमा साउथ सिनेमाचा रिमेक असला तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्स्फुर्त होता. तृतीयपंथीय हे देखील समाजाचा एक भाग असून मनोरंजन क्षेत्रातही हा मोठा बदल दिसून येत आहे. एकता कपूरच्या आगामी सिनेमातील मुख्य भुमिका साकारणारी कलाकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकता कपूरच्या बॅनरखाली येणाऱ्या सिनेमाची आणि त्यातील कलाकारांची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. एकता कपूरचा आगामी सिनेमा 'लव सेक्स और धोका 2' साठी एका तृतीयपंथी कलाकाराची मुख्य भुमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
बोनिता राजपुरोहित ही मुळची राजस्थानची आहे. बनिता पुरोहित मिस ट्रांस क्वीन 2019 मधील रनर-अप विजेती आहे. असं सगळं असलं तरी इथपर्यंत पोहोचणं तिच्याकरीता कठीण होतं. एकता कपूरच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळण्याआधी ती दहा हजार महिना नोकरी करत होती. तृतीयपंथी असल्याने समाजात तिचं जगणं खडतर होतं. आजपर्यंत आयुष्याची गोष्ट सांगताना बोनिता म्हणते की, इथपर्यंत पोहोचणं आव्हानात्मक होतं. घरची परिस्थिती आणि समाजाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट होता. नोकरीच्या शोधात असताना उपाशी पोटी रेल्वे स्टेशनवर झोपण्याची वेळ ही आली होती. बोनिता पुढे असंही की, स्वप्नं पाहिली की ते पूर्ण करण्याची ताकद ही देतात. प्रॉडक्शन हाऊसला दहा हजारांची नोकरी करताना मुंबई सारख्या मोठ्या शहरात येऊन राहणं सोपं नव्हतं. बराच काळ संघर्ष केल्यानंतर तीला हा मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात ती मुख्य भुमिकेत असून तृतीयपंथीयांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं याबद्दल हा सिनेमा भाष्य करणार असल्याचं म्हटलं जातं. काहीतरी वेगळं करून दाखवावं असं बोमिताचं लहानपणापासूनचं ध्येय होतं. ते तिने या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण केलं.
'लव सेक्स और धोका 2' या एकता कपूरच्या आगामी सिनेमात बोनिता मुख्ये भूमिकेत झळकणार आहे. असं म्हटलं जातं की, हा सिनेमा तिच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. एका सर्वसामान्य घरातील बोनिता हिने 2019 मध्ये मिस ट्रांस क्वीन रनर-अप विजेतेपद मिळनल्यानंतर ते 'लव सेक्स और धोका 2' या सिनेमातील मुख्य भुमिका निभावण्यार्यंतचा तिचा संघर्ष कठीण होता. तिच्या या आगामी सिनेमाती भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.