'आजकाल प्रत्येकाला प्रसिद्धी हवी'; अरशद वारसीच्या आरोपांवर भडकले बोनी कपूर

Boney Kapoor Befitting Reply To Arshad Warsi : बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरशद वारसीच्या मानधनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 23, 2024, 02:09 PM IST
'आजकाल प्रत्येकाला प्रसिद्धी हवी'; अरशद वारसीच्या आरोपांवर भडकले बोनी कपूर title=
(Photo Credit : Social Media)

Boney Kapoor Befitting Reply To Arshad Warsi : बॉलिवूज अभिनेता अरशद वारसीची एक मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यानं प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' तील भूमिकेला जोकर म्हटलं. तर याच मुलाखतीत अरशदनं आणखी एका गोष्टीवर वक्तव्य केलं. ते म्हणजे 1992 मध्ये त्याला रुप की राणी चोरों का राजा या गाण्याच्या कोरिओग्राफी करण्यासाठी 1 लाख रुपयांचं मानधन देणार असल्याचं म्हटलं होतं. पण जेव्हा त्यानं काम पूर्ण केलं तेव्हा त्याला पूर्ण मानधन दिलं नाही. अरशदच्या या दाव्यानंतर चित्रपट निर्माता बोनी कपूर यांनी रिअॅक्शन दिली आहे. त्यांनी म्हटलं की काही लोकांना प्रसिद्धी हवी असते त्यामुळे ते असे वक्तव्य करतात. 

1 लाख सांगून दिले फक्त 75 हजार 

समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत अरशद वारसीनं दावा केला की या चित्रपटात डान्स कोरिओग्राफ करण्यासाठी त्याला चार दिवसांची वेळ दिली होती. तर त्यासाठी त्याला 1 लाख रुपये मानधन देण्याची कबूली दिली होती. पण प्रोडक्शन टीमनं त्याला विचारलं की काय तो तीन दिवसात हे शूट संपवू शकतो का जेणे करून त्यांचे पैसे वाचतील. अरशद म्हणाला की 'ते माझी स्तुती करतील या आशेत मी हे शूट तीन दिवसांत संपवलं. पण जेव्हा मी माझे पैसे घेण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला 1 लाख रुपये न देता 75 हजार रुपये दिले. त्यांनी सांगितलं की चार दिवसांसाठी 1 लाख रुपये होते, तीन दिवसांत संपवल्यानं 75 हजार मिळाले.' 

तीन दिवसात शूट केल्यानं 75 हजार रुपये मिळण्यावर अरशद म्हणाला, हे मला योग्य वाटलं नाही. आता अरशद ज्या चित्रपटाविषयी बोलतोय त्या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर होते. आता बोनी कपूर यांनी 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत अरशदच्या या आरोपांवर उत्तर दिलं आहे. बोनी कपूर यांनी सांगितलं की 'मी त्याचं वक्तव्य ऐकलं. हे 1992 मध्ये झालं आणि तो आता त्यावर बोलतोय. त्यावेळी तो स्टार नव्हता. कोणी त्याला इतकी मोठी रक्कम दिली असती?' बोनी यांनी पुढे सांगितलं की 'अरशदला प्रत्येक दिवसाच्या हिशोबानं 25 हजार रुपये देण्यात आले होते आणि त्यामुळेच तीन दिवसांसाठी 75 हजार रुपये देण्यात आले होते.' 

बोनी कपूर यांनी सांगितलं की 'मला ही घटना आठवण देखील नाही. असं नव्हतं की एक ठरावीक रक्कम देणार असल्याचं वचन दिलं होतं. जितके दिवस त्यांनी काम केलं, त्या प्रमाणेच पैसे देण्यात आले.' 

हेही वाचा : अफगाणिस्तानपर्यंत कट्टर चाहते असणाऱ्या अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी केल्या होत्या तब्बल 29 सर्जरी!

अरशदनं याविषयी कधी चर्चा केली का असं विचारताच बोनी कपूर म्हणाले 'नाही, त्यानं कधीच त्यावर चर्चा केली नाही. आम्ही मलायका अरोरा आणि फराह खान एकत्र होतो आणि आम्ही कधीच काही बोललो नाही. आता अचानक तो याविषयी बोलतोय. आजकाल प्रत्येकाला प्रसिद्धी हवी आणि अशात मी एक सोपं असं असलेलं टार्गेट आहे.' 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x