'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण

Gadar 2 Bomb Blast : एकीकडे चित्रपटगृहात  'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे चित्रपटगृहाच्या बाहेर बॉम्ब ब्लास झाला. या घटनेचं कारण आता समोर आलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 19, 2023, 11:33 AM IST
'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण title=
(Photo Credit : Social Media)

Gadar 2 Bomb Blast : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडताना दिसत आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई केली आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' या चित्रपटाचा हा दुसरा भाग तब्बल 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात असलेली क्रेझ ही प्रेक्षकांना खरंच विश्वास ठेवू शकत नाही इतकी आहे. एकीकडे सनी देओलच्या अॅक्शनचे प्रेक्षक दिवाने झाले आहेत तर दुसरीकडे चित्रपटगृहात हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा ऐकायला मिळत आहेत. इतकं असताना पाटणा येथे एका चित्रपटागृहाबाहेर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या रिपोर्टनुसार, पाटणामध्ये ‘गदर 2’ च्या तिकिटांना प्रचंड मागणी असल्याने चित्रपटगृहामध्ये एकच गोंधळ उडाला होता. हा गोंधळ इतका वाढला की, दोन संशयितांनी चित्रपटगृहाच्या बाहेर कमी-तीव्रतेचे बॉम्ब फेकले. त्यापैकी एका बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेनंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या चित्रपटगृहाचे मालक सुमन सिन्हा यांनी या बातमीला दुजोरा दिला असून याविषयी बोलताना सांगितले की ज्या लोकांनी हे बॉम्बटाकले त्यांना चित्रपटाची तिकिटं ही ब्लॅकनं विकायची होती. पण जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांना असे करण्यापासून थांबवले तेव्हा त्यांनी हा स्फोट केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे आणखी बोलत असताना सुमन सिन्हा म्हणाले की लोक अशा घटना या नेहमीच होत असतात. अनेक लोक अशा वाईट हेतूनं येतात. आम्ही त्यांचा ब्लॅकनं तिकिटं विकू देत नाही त्यामुळे असा प्रकार होतो. पण कर्मचाऱ्यांनी वेळीच त्यांना थांबवले म्हणून हे जास्त वाढलं नाही. इतकंच नाही तर हा स्फोट होतो तो थिएटरपासून खूप लांब अंतरावर झाला त्यामुळे जास्त गंभीर परिस्थिती झाली नाही. तर संशयित व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. 

हेही वाचा : जुळ्या मुलांना स्तनपानादरम्यानच्या अडचणींवर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री, तिची समस्या महिलांनाच लक्षात येईल

'गदर 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर त्यानं तब्बल 8 दिवसात 300 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तर दुसरीकडे आता हा चित्रपट परदेशात काही चांगली कमाई करू शकला नाही. या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.