जुळ्या मुलांना स्तनपानादरम्यानच्या अडचणींवर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री, तिची समस्या महिलांनाच लक्षात येईल

Actress on Breastfeeding : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुळ्या मुलं झाल्यानंतर होणाऱ्या समस्यांविषयी सांगितलं आहे. अभिनेत्रीनं सांगितलेल्या या समस्या अनेक महिलांच्या लक्षात येणाऱ्या आहेत.

दिक्षा पाटील | Updated: Aug 19, 2023, 10:57 AM IST
जुळ्या मुलांना स्तनपानादरम्यानच्या अडचणींवर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री, तिची समस्या महिलांनाच लक्षात येईल title=
(Photo Credit : freepik)

Pankhuri Awasthi on Breastfeeding : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुडी अवस्थी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जुळ्या मुलांचा जन्म झाला. गौतम आणि पंखुडी यांना एक नाही तर दोन मुलं झाल्यानं त्यांचा आनंद हा द्विगुणीत झाला आहे. आई झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्रास होतो यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंखुडीनं सांगितलं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन मुलांना ब्रेस्ट फीडिंग करत असताना तिला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो हे तिनं सांगितलं आहे. 

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आई झालेल्या पंखुडीनं मुलांना जन्म दिल्यानंतर कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याविषयी सांगितले आहे. 'एक नवीन आई म्हटल्यावर अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला सांभाळण कठीण होतं. कारण आपण अचानक एका नव्या जगात पदार्पण करतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते स्तनपान करणं. स्तनपान करणं हा मेटरनिटीच्या प्रवासातील सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. एक समाज म्हणून आपण अनेक गोष्टींना स्वीकार करू लागलो आहोत आणि मला वाटतं नाही की ब्रेस्टफीडिंग त्यातून काही वेगळं नाही', असं पंखुडी म्हणाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी पुढे सविस्तर सांगत असताना पंखुडीनं सांगितलं की 'जर तुम्हाला सगळ्यांसमोर तुमच्या बाळाला स्तनपान करायचे असेल, तर कोणाला काही वाटायला नको. आधी महिलांना बाळाला फीड करण्यासाठी आतल्या बाजुला जायला सांगायचे किंवा मग भिंतीकडे पाठ करून स्तनपान करण्यास सांगितले जायचे. पण आता तुम्ही प्रवास करत असतात, तेव्हा काय करतात? तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना स्तनपान नाही करणार का?' 

हेही वाचा : पापाराझींना पाहताच दिया मिर्झाच्या सावत्र लेकीनं का लपवला चेहरा?

पंखुडी पुढे म्हणाली की 'मी फक्त या गोष्टीला समजून घेते, दोन मुलांचा एकत्र सांभाळ करणं खूप कठीण आहे. त्या दोघांना एकाच वेळी भूक लागेल किंवा एकाच वेळी जाग येईन याची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. मला हे समजून घेण्यास खूप त्रास होत आहे की याविषयी मी काय करायला हवं. मला आनंद आहे की माझं कुटुंब आणि माझा पती गौतम माझ्यासोबत आहे. अचानक एक नवं विश्व आपल्या समोर येतं आणि त्यात तुम्ही अनेक गोष्टींमध्ये आनंदी होतो.' पंखुडी आणि गौतम यांनी जुळी मुलं झाली असून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. खरंतर अनेक महिला आहेत ज्यांना जुळी मुलं आहेत त्यांना पंखुडीनं सांगितलेल्या या समस्ये लगेच लक्षात येतील.