बॉलिवूडचे सर्वात महागडे घटस्फोट, पोटगीच्या रकमेवर तुमचा विश्वासही बसणार नाही

घटस्फोटानंतर  पोटगी...   

Updated: Jan 19, 2022, 01:44 PM IST
बॉलिवूडचे सर्वात महागडे घटस्फोट, पोटगीच्या रकमेवर तुमचा विश्वासही बसणार नाही title=

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लव्ह लाईफपेक्षा घटस्फोट आणि ब्रेकअपमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये जितक्या लवकर नातेसंबंध तयार होतात, तितक्या लवकर ते तुटतात आणि वेगळे होतात. नुकताचं सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष  विभक्त झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. 

याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत, नातं संपवलं. पण काही प्रसिद्ध बॉलिवूडकरांच्या घटस्फोटाच्या चर्चा अद्यापही रंगलेल्या असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना आपल्या जोडीदारापासून वेगळे होण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली. 

अशा काही सेलिब्रिटी जोडप्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या जोड्यामधील तिसऱ्या जोडप्याचं घटस्फोट अत्यंत महागडं होतं. जे आजही चर्चेत आहे. 

अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ता 

lokpjgo8

आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ताशी त्याच्या कुटुंबाविरुद्ध लग्न केलं. 2002 मध्ये त्यांचं घटस्फोट झालं. या घटस्फोटासाठी आमिर खानला 50 कोटी मोजावे लागल्याचं सांगण्यात येत...

अभिनेता सैफ अली खान- अभिनेत्री अमृता सिंग

सैफ अली खानने 2004 मध्ये स्वत:हून 13 वर्षांनी मोठ्या अमृता सिंगसोबत लग्न केल्यानंतर काही वर्षात वेगळे झाले. सैफने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, पोटगी म्हणून अमृताने सैफकडून 5 कोटींची मागणी करण्यात आली. यासोबतच मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिन्याला लाखो रुपयांची मागणी करण्यात आली.

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान

6 most expensive divorces of Bollywood!

हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट होता. सुझानपासून वेगळे होण्यासाठी हृतिकने तिला 380 कोटी रुपये दिल्याचे सांगितले जाते. मात्र, 400 कोटींची मागणी करण्यात आली.

फरहान अख्तर-अधुना भबानी
फरहान आणि अधुनाने लग्न झाल्यानंतर 16 वर्षांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या बदल्यात त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे मुंबईतील बंगला मागितला होता. यासोबतचं तो मुलीची काळजी घेण्यासाठी अधुनाला दर महिन्याला मोठी रक्कम देतो.