सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचं 11 वर्षांचं प्रेम, मात्र लग्न करु शकले नाहीत

लग्न झालेलं असतानाही  सनी देओलने डिंपल कपाडियाला आपलं हृदय दिलं होतं

Updated: Apr 27, 2021, 01:37 PM IST
सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचं 11 वर्षांचं प्रेम, मात्र लग्न करु शकले नाहीत title=

मुंबई : बॉलीवुडच्या बऱ्याच दशकांपासून हिरो-हिरोईनचं नाव एकमेकांसोबत जोडलं जातं आणि हे अजुनही  सुरूच आहे. 90 च्या दशकात अशी एक सुपरस्टार  जोडी सनी देओल आणि डिंपल कपाडिया होती. जरी आज सनीचे एक सुखी कुटुंब आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा डिंपल आणि सनी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले होते. बॉलिवूडमध्ये जेव्हा सनी एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देत होता, तेव्हा त्याचं नाव अभिनेत्री अमृता सिंगशीही जोडलं जात होतं. सनीने तिच्याबरोबर त्याच्या पहिल्या सिनेमात 'बेताम'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासून या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या

कारकीर्दीच्या सुरुवातीलाचं सनीचं लग्न झालं होतं, पण लग्न झालेलं असतानाही  सनी देओलने डिंपल कपाडियाला आपलं हृदय दिलं होतं. डिंपल राजेश खन्नाची पत्नी  होती. दोघांनी 'अर्जुन', 'मंजिल-मंजिल', 'गुण', 'नरसिम्हा' सारख्या बर्‍याच यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. एकत्र काम करताना या दोघांच्या अफेअरच्या चर्चाही होऊ लागल्या होत्या. मात्र, सनी किंवा डिंपल दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दरम्यान, सनीची एक्स गर्लफ्रेंड अमृता सिंगने या दोघांमधील नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं.

एका मुलाखतीत अमृता म्हणाली- 'माझा विश्वास आहे की त्याकडे काहीच गमावण्यासारखं नाही आहे. जेव्हा आपण आधीपासूनच असं जीवन जगलो असतो., तेव्हा आपण अशा नात्याच्या शोधात असतो जे यथास्थिति  असतं. ' अमृताने हा खुलासा केल्यावर थोड्याच वेळात डिंपल राजेश खन्नापासून विभक्त राहू लागली. मीडिया रिपोर्टनुसार, डिंपलच्या दोन्ही मुली ट्विंकल खन्ना आणि रिन्की खन्ना सनी देओलला 'लहान वडील' म्हणून संबोधतात.

इतकंच नव्हे तर २००९ मध्ये डिंपलची बहीण सिंपल यांचं निधन झालं, तेव्हा सनी डिंपलच्या घरी पोहचला होता. यानंतर सनी आणि डिंपलविषयी बरीच चर्चा झाली. या वृत्तांनी कंटाळलेली सनीची पत्नी पूजा देओलने त्याला सोडण्याची धमकीही दिली. मात्र यावेळी सनीने आपल्या मुलापासून विभक्त होऊ नये, म्हणून पूजासमोर हार मानली आणि तिची माफी मागितली

मात्र, सनी आणि डिंपलची प्रेमकथा ईथेच संपली नाही. वृत्तानुसार, दोघेही अद्याप भेटत राहिले. काही काळापूर्वी, सनी आणि डिंपल मोनाको येथे सुट्टीसाठी गेले होते, तिथंला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बरं! आता खरी गोष्ट काय ते फक्त सनी आणि डिंपल यांनाच माहित आहे.